घायवळला कानशिलात लगावणारा कोण?
सागर मोहोळकर तरुण पहिलवानाने निलेश घायवळच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. पहिलवान सागर मोहोळकर हा अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला उपस्थित होता. गावात जत्रेनिमित्त कुस्तीचा फड भरला होता. सागर हाही इथं आला होता. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळही कुस्ती पाहायला आला होता. यावेळी तो आयोजकांसोबत पहिलवानांना भेटण्यासाठी जात असताना अचानक सागरने घायवळवर हल्ला केला. गर्दीतून वाट काढत सागरने निलेश घायवळला कानशिलात लगावल्या आहेत.
advertisement
घायवळला का मारलं? समोर आलं कारण...
आंध्रड गावातील कुस्ती आयोजक ज्ञानेश्वर गीते यांनी या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. गीते यांनी सांगितले की, गावात काल दोन कुस्त्यांचे फड एकाच वेळी सुरू होती. एक राजकीय विरोधकांचा फड होता आणि एक सार्वजनिक गावाचा फड होता. राजकीय विरोधकांनी आयोजित केलेल्या फडात बाहेरील पहिलवानाला खेळवले. गावचा सार्वजनिक कुस्तीचा फड उधळण्यासाठी त्याला अधिकचे बक्षिस दिले होते. तो तरुण नशा करून आला होता, असेही गीते यांनी म्हटले.
ज्ञानेश्वर गीते यांनी पुढे म्हटले की, नशेत असलेला तरुण हा माझी कुस्ती लावा यासाठी तो मागणी करत होता, पंचांकडे मागणी केली. त्यांनी दुर्लक्ष केले. माझ्याकडे ही त्याने मागणी केली होती. मात्र, आमच्या नियोजित कुस्त्यांमुळे त्याची मागणी आम्ही फेटाळून लावली. निलेश घायवळ देखील तिकडे होता, पहिलवानाला बक्षीस देत होता. पहिलवानांमध्ये घायवळ प्रसिद्ध असल्याने त्यांच्याशी संवाद साधला जात होता. त्यावेळी तो नशेखोर तरुण कुस्ती लावण्यासाठी मागणी करत होता. त्याच दरम्यान निलेश घायवळ आणि त्यांच्यात बाचाबाची झाल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. घायवळ याला मारहाण झाली नसल्याचे गीते यांनी स्पष्ट केले.