चिखली तालुक्यातील हातनी येथील पूल देखील पाण्याखाली गेला आहे. पुलावरून पुराचं पाणी वेगाने वाहत आहेत. अशात या पुलावरून पाणी वाहत असताना एका तरुणाने स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने पुराच्या पाण्यातून दुचाकी काढण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याची ही स्टंटबाजी चांगलीच अंगलट आली. पुरातून बाईक काढण्याचा प्रयत्न करणारा युवक थोडक्यात बचावला आहे.
advertisement
स्थानिकांनी समय सूचकता दाखवत त्याला ओढून पाण्याबाहेर काढल्याने या तरुणाचे प्राण वाचले आहे. पुराच्या पाण्यातून हा युवक मार्ग काढण्याचा जीवघेणा प्रयत्न करत होता. मात्र पुराच्या पाण्यात दुचाकी टाकताच त्याचा दुचाकी वरील ताबा सुटला आणि दुचाकी वाहून जाऊ लागली. मात्र त्याला दुचाकीचा मोह आवरत नव्हता. संबंधित तरुण जीव धोक्यात घालून दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता.
दरम्यान, त्याचा हा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतण्याची परिस्थिती निर्माण झाली. अशात स्थानिकांनी या युवकाला धरून पुराच्या पाण्याबाहेर काढले. पण त्याच्या या स्टंटबाजीमुळे त्याची दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.