राजू शिंदेंच्या प्रवेशामुळे ठाकरेंच्या सेनेत नाराजीनाट्य? उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर च्या दौऱ्यावर होते. त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसंकल्प मेळावा देखील पार पडला. मात्र हा मेळावा गाजला तो भाजपाचे माजी उपमहापौर यांच्या पक्षप्रवेशाने मागच्या दोन दिवसापासून शहरात त्यांच्या प्रवेशाच्या चर्चा होत्या आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. कारण, भाजपच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी राजू शिंदे यांना ठाकरे गटात जाऊ नये यासाठी मनधरणी केली. मात्र राजू शिंदे हे ठाकरे गटात दाखल झालेच. राजू शिंदे हे ठाकरे गटात येताच पश्चिम विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्या उमेदवारांचे धाबे दणाणले. कारण, 2019 मध्ये संजय शिरसाट यांना राजू शिंदे यांनी कडवी टक्कर दिली होती. त्यामुळे त्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार यात शंका नाही.
advertisement
त्यामुळेच बाकीच्या इच्छुकांचा भ्रमनिरास झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच हे बॅनर ठाकरे गटातील इच्छुकांनी लावले की मग भाजपाने ठाकरेंना डीवचण्यासाठी लावले हा चर्चेचा विषय आहे. कारण बॅनर लावणाऱ्यांनी आपले कुठलेही नाव गाव लिहिले नाही. काही अपक्ष देखील ठाकरे गटातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांनी ही बॅनरबाजी केली का हा देखील प्रश्न आहे. ज्यांच्या येण्याने या सर्व घडामोडी सुरू झाली त्या राजू शिंदे यांनी मात्र स्पष्टपणे आपण कुठलाही शब्द घेऊन किंवा देऊन पक्षात आलेलो नाही. मी फक्त एकच शब्द उद्धव ठाकरे यांना दिला होता की मला तुमच्याकडे यायचे आहे आणि त्यांनी माझे स्वागत केले ते जी भूमिका देतील ती मला मान्य असेल असं राजू शिंदे यांनी सांगितलं.
'योजनांची अतिवृष्टी पण' उद्धव ठाकरेंनी ठेवलं सरकारच्या मर्मावर बोट, म्हणाले..
विधानसभेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे. तोपर्यंत कोण काम करतो कोण नाही करतो ते पहिल्या जाईल. कोण गद्दाराला पाडेल हे सर्व बघावं लागेल त्यानंतर निर्णय घेऊ अशी भूमिका या बॅनरवर चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.अंबादास दानवे यांनी तर या बॅनर वरून होणाऱ्या चर्चा किंवा बॅनर मध्ये उपस्थित केलेले प्रश्न फेटाळूनच लावले. शिवसेना कुणालाही शब्द देत नाही तशी पद्धत आमच्याकडे नाही. आम्ही शब्द देत नाही तर घोषणा करतो असं स्पष्ट मत दानवे यांनी व्यक्त केलं.
