TRENDING:

माझ्या मुलीची छेड का काढली? आई बाप विचारायला गेले, टपोऱ्या भाईंनी दांड्याने मारलं

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar Crime: नववीत शिकणारी 14 वर्षीय मुलगी शाळेतून घरी येत होती. त्यावेळी तिघांनी तिची छेड काढली. जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकांनी आरोपींनी बेदम मारहाण केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला हाताचापट्याने, लाकडी दांड्याने आणि लाथांनी बेदम मारहाण केली. ही घटना जोगेश्वरी येथे बुधवारी (ता.5) रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींकडून मुलीच्या पालकांना मारहाण
आरोपींकडून मुलीच्या पालकांना मारहाण
advertisement

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जोगेश्वरी येथील 14 वर्षीय मुलगी, आई, वडील, भाऊ व बहिणीसह भाड्याच्या घरात राहतात. आई, वडील खाजगी नोकरी करतात. मंगळवारी (ता.4) रोजी नववीत शिकणारी 14 वर्षीय मुलगी शाळेतून घरी येत होती. त्यावेळी आरोपी निलेश दुबिले, ऋषिकेष दुबिले, प्रतीक राजुपत यांनी तिला अश्लिल हातवारे करीत तिचा पाठलाग करत असल्याचे तिने घरी आल्यानंतर सांगितले. तिची आई घराबाहेर आली असता तिघेही पळून गेले.

advertisement

शिवीगाळ करीत दगडाने, लाकडी दांड्याने मारहाण

बुधवारी (ता.5) रोजी अंदाजे पाच ते साडे पाच वाजेच्या सुमारास 14 वर्षीय मुलगी घराचा ओटा झाडत असताना निलेश दुबिले, ऋषिकेष दुबिले, प्रतीक राजुपत हे तिला पाहून आवाज देऊन तिच्या मनात लज्जा वाटेल असे कृत्य केले. याबाबत त्यांना विचारणा केली असता, तिघांनी शिवीगाळ करत लाकडी दांड्याने तसेच जे हातात येईल त्याने पीडित मुलीच्या आईला छातीवर लाथाने व डोक्यात दगड मारून जखमी केले.

advertisement

वडिलांनाही ते तिघे मारत असताना तेथे प्रविण डिगंबर काजळे, कृष्णा काजळे, सतिश काजळे हे भांडण सोडवण्यास आले, तेव्हा त्या तिघांनाही हाताचापटाने मारहाण करून शिवीगाळ केली. त्या तिघांसोबत आणखी काही मुले असण्याचा संशय आहे.

तिघांविरोधात वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडतेय? शरिराला लावा तिळाचे कोमट तेल, होतील हे फायदे
सर्व पहा

कारण मारहाण करीत असताना तेथे लोकांची गर्दी झाली होती. याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी निलेश दुबिले, ऋषिकेष दुबिले, प्रतीक राजुपत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
माझ्या मुलीची छेड का काढली? आई बाप विचारायला गेले, टपोऱ्या भाईंनी दांड्याने मारलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल