30 वर्षीय महिला देवळाई भागात राहते. तिच्या मुलीच्या वाढदिवसाला पतीचे दोघे भाचे (यापैकी एक अल्पवयीन) घरी आले होते. त्या दिवशी पतीने पत्नीला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावले आणि तिच्यावर अत्याचार केला. नंतर दोन्ही भाच्यांनीही तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराचा एका भाच्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्याच्या आधारे तिला धमकावून शांत बसवले, असे पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. ही माहिती उघड करत तिने नवी मुंबईत तक्रार दाखल केली होती.
advertisement
दरम्यान, या प्रकरणाला दुसरी बाजूही पुढे आली आहे. चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन भाच्याने सप्टेंबरमध्ये तक्रार दिली होती की, मामीने त्याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्या तक्रारीवरून पोक्सो कायद्यान्वये मामीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पुढे हा प्रकार पतीच्या लक्षात आला आणि भाच्यावर अत्याचार होत असल्याची माहिती समोर आली.
या दोन्ही तक्रारीनंतर प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले असून एकमेकांविरुद्ध गंभीर आरोप होत आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक समाधान पवार करत आहेत.
