नेमकं घडलं कधी?
27 ऑक्टोबर रोजी रात्री हा मुलगा शुभांश (नाव बदलले आहे) च्या दातात वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्यास बिराजदारच्या दवाखान्यात नेले. नंतर 1 नोव्हेंबर रोजी आई-वडील पुन्हा त्यास घेऊन गेले. मात्र, बाहेर उभ्या वडिलांना शुभांशच्या रडण्याचा आवाज असह्य झाला. त्यांनी आत धाव घेतली तेव्हा शुभांश अत्यंत घाबरला होता. त्यामुळे आई-वडील त्याला तसेच घरी घेऊन गेले.
advertisement
डॉक्टरचा नकार
घरी गेल्यावर आईला शुभांशच्या गालावर मारण्याचे व्रण आढळले. शुभांशने रडतच आई-वडिलांना मारहाणीबाबत सांगितले. त्यांनी बिराजदारला विचारणा केली. मात्र त्याने नकार दिला. सीसीटीव्ही फुटेज मागताच आधी नकार दिला. मात्र, डीव्हीआर खराब झाल्याचे सांगून तुम्हीच दुरुस्त करा, असे म्हणत त्यांना डीव्हीआर दिला.
डॉक्टरांची देखील तक्रार; मारहाण, शिवीगाळीचा आरोप
सदर प्रकरणात डॉ. बिराजदार यांनीदेखील पोलिसांकडे तक्रार करत सर्व आरोप फेटाळून लावत तक्रारदार कुटुंबावर आरोप केले. मुलाच्या कुटुंबाने 'चुकीचे उपचार करून जास्तीचे पैसे घेतले', असे म्हणत रुग्णालयात धिंगाणा घातला. मारहाण करून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. शिवाय, बळजबरीने डीव्हीआर नेत शहर सोडण्यासाठी धमकावले. यात माझा कुठलाही दोष नसून 20 वर्षांच्या सेवेत मी कधीही गैरप्रकार केलेला नाही. सदर कुटुंबाकडून मला धोका असून सर्व आरोप खोटे असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या कंपाउंडरने देखील अशीच स्वतंत्र तक्रार पोलिसांकडे दाखल केली
7 रोजी तज्ज्ञाच्या मदतीने डीव्हीआर दुरुस्त करून फुटेज पाहण्यात आले. त्यात बिराजदार व त्याचा कंपाउंडर किरण अमानुष मारहाण करताना दिसले. यामुळे आई-वडिलांनी बिराजदारला विचारणा केली. तेव्हा त्याने 'हा उपचारांचा भाग आहे' असे म्हणत हात वर केले. वाद वाढल्यानंतर दोघांना शिवीगाळ करून 'तुम्हाला बघून घेतो', असे धमकावले. सहायक निरीक्षक शिवाजी चौरे अधिक तपास करीत आहेत.
