राष्ट्रवादी अन् भाजप कार्यकर्ते आमनेसामने
आव्हाडांच्या या भूमिकेनंतर तुळजापूरकरांनी त्यांची गाडी अडवली आणि ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी 'आव्हाड तुळजापूर भवानी मंदिराची बदनामी करत आहे', असा आरोप करण्यात आला. राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
जितेंद्र आव्हाडांना विकासकामांना दर्शवला विरोध
advertisement
सध्या तुळजा भवानी मंदिर संस्थानाकडून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यात देवीच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीसहीत अन्य विकासकामेदेखील सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर सशुल्क आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र दर्शनही बंद आहे. फक्त मुखदर्शन आणि धर्मदर्शन सुरू आहे. पहिल्यांदा जितेंद्र आव्हाडांनी देवीचे दर्शन घेतले आणि त्यांना सुरू असलेल्या मंदिराच्या विकासकामांना विरोध केला.
मंदिराच्या विकासकामांची बदनामी करण्याचा घाट
जितेंद्र आव्हाड मंदिरात होते, तेव्हा बाहेर जमलेल्या तुळजापूरकारांकडून आव्हाड यांच्या वक्तव्याचा विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. आव्हाडांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन करत भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या गोंधळात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मध्यस्थी केली. याच दरम्यान राणा जगजीतसिंह पाटील यांनी मंदिराच्या जीर्णोद्धार विकासकामांची बदनामी करण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप केला.
हे ही वाचा : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट? रोहित पवारांचं मोठं विधान, म्हणाले, "एक गट भाजपप्रेमी अन्..."
हे ही वाचा : नाशिककरांनो, लक्ष द्या! सिटीलिंक बससेवेत होणार मोठा बदल, आता 'या' बसफेऱ्या होणार बंद
