TRENDING:

Diabetes Care : दिवाळीच्या फराळाचा 'स्वाद' घ्या, पण 'प्रमाण' पाळा! तज्ज्ञांनी दिला डायबिटीस नियंत्रणाचा गुरुमंत्र

Last Updated:

Diwali 2025 : दिवाळीच्या काळात डायबिटीज रुग्णांनी रक्तातील साखरेचे सतत निरीक्षण करावे. गोड पदार्थ नियंत्रित प्रमाणात खावेत किंवा साखरेच्या पर्यायांचा वापर करावा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सणानिमित्त आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची गोड पदार्थ केले जातात तसेच मोठ्या प्रमाणात तळणीची देखील पदार्थ असतात. पण दिवाळीचा फराळ करत असताना ते मधुमेह रुग्ण आहेत किंवा जे हृदयरोग रुग्ण आहेत यांनी आपला फराळ कशा पद्धतीने घेतला पाहिजे जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर याविषयी आपल्याला माहिती सांगितलेली आहे आहार तज्ञ मंजू मंठाळकर यांनी.
advertisement

आपल्याकडे मोठ्या प्रमाणात फराळ हे तळलेले असतात किंवा गोड असतात आणि यामुळे ते मधुमेह रुग्ण आहेत त्यांची शुगर वाढण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते आणि जर तुम्हालाही पदार्थ खायचे असेल तर ते पदार्थ खाताना काळजी घेणं खूप गरजेचे असतं. ज्या पदार्थांमध्ये तुम्ही आर्टिफिशियल स्वीटनर वापरता येत असेल तर त्या पदार्थांमध्ये तुम्ही ते वापरून सेवन केले तर फायद्याचे ठरते.

advertisement

दिवाळीमध्ये घरामध्ये मोठ्या प्रमाणात गोड असतं आणि ते खाण्याची आपल्याला इच्छा होत असते पण ते खाण्याचे प्रमाण निश्चित असणं गरजेचं आहे आणि फराळ करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे फराळ करताना सुरुवातीला तुम्ही काहीतरी लिक्विड घ्या त्यानंतर तुम्ही सलाड खा आणि त्यानंतर फराळ खा हा जर सिक्वेस तुम्ही लक्षात ठेवून फराळ केला तर त्यामुळे तुमची शुगर वाढणार नाहीत आणि जे हृदयरोग रुग्ण आहेत कळाले केल्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोनं महागलंय, दिवाळीत घ्या हटके अन् स्टायलिश ज्वेलरी, किंमत फक्त 145 रुपयांपासून
सर्व पहा

बाहेरचा फरार खाणे शक्यतो तुम्ही टाळावे म्हणजे यामुळे तुम्हाला कुठलाही दुष्परिणाम होणार नाही ही जर काळजी तुम्ही घेतली तर नक्कीच तुमच्या सर्व गोष्टी नियंत्रणात राहतील असं आहार तज्ञांनी सांगितलं आहे

मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Diabetes Care : दिवाळीच्या फराळाचा 'स्वाद' घ्या, पण 'प्रमाण' पाळा! तज्ज्ञांनी दिला डायबिटीस नियंत्रणाचा गुरुमंत्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल