राजस्थानचा बिकानेर येथील राजा कर्णसिंग 1835 मध्ये शहरात वास्तव्यासाठी आले होते. छावणी परिसरातील कर्णपुरा येथे त्याचे वास्तव्य होते. बिकानेर महाराजा कर्णसिंह यांनी शहराबाहेर खामनदीला लागून छावणी टाकली होती. हा भाग पुढे त्यांच्याच नावे "कर्णपुरा' म्हणून ओळखला जाऊ लागला. राजा कर्णसिंग राजस्थान येथील कर्णिका मातेचे भक्त होते. या ठिकाणी देखील कर्णिका मातेचे मंदिर बांधायचे त्याने ठरवले. त्यानंतर या मंदिराची उभारणी करण्यात आली. राजस्थानी शैलीने हे मंदिर उभारण्यात येते.
advertisement
कालांतराने 1982 मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. कर्णसिंग यांचे या परिसरात 20 ते 25 वर्षे वास्तव्य होते. त्यानंतर येथील दानवे कुटुंबाकडे या मंदिराचे पुजारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. दानवे कुंटुबाची सातवी पिढी सध्या मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहत आहेत. नऊ दिवस या ठिकाणी मोठा उत्सव असतो, यात्रा भरते. अनेक दुकान देखील असतात, यातून गावातल्या मंडळींना रोजगार भेटतो. सध्या तरी दानवे कुटुंबीयांची सातवी सातवी पिढी मंदिराच्या पुजारीचं काम बघत आहेत. अतिशय आनंदमय वातावरण नऊ दिवस या ठिकाणी असतं.