कारवाईत याशिवाय भगर, मिरची पावडर, मसाले आदी पदार्थांचेही सुमारे 5122 किलो साठे हस्तगत झाले. एकूण जप्त मालाची किंमत 92 लाख 96 हजार 760 रुपये इतकी आहे, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी श्रीनिवास केदार यांनी दिली. सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा’ या विशेष अभियानांतर्गत 11 ऑगस्टपासून ही मोहीम सुरू आहे. यात खाद्यतेल: 42294 किलो किंमत 84 लाख 45 हजार 537 रुपये आहे.
advertisement
भगर, मिरची पावडर, मसाले इ. 5122 किलो किंमत 6 लाख 23 हजार 426 रुपये आहे. भेसळीचे प्रकारमहागड्या तेलात स्वस्त तेल मिसळून ग्राहकांची फसवणूक केली जाते. उदाहरणार्थ: शेंगदाणा तेलात सोयाबीन किंवा पामोलीन तेल सूर्यफूल तेलात सोयाबीन तेल सोयाबीन तेलात पामोलीन तेल मिसळून ग्राहकांना फसवले जाते.
डब्यातले तेल हे नेहमीच वजन करुन घ्यावे, बऱ्याचदा कमी तेल त्यात दिले जाते. ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचनातेलाचा डबा घेताना ‘बेस्ट बिफोर’ तारीख तपासा. डबा पूर्णपणे सीलबंद आहे ना हे पाहा. ब्रँड, डब्याची नवीनता याची खात्री करा. वजन तपासून घ्या अनेकदा कमी प्रमाणात तेल दिले जाते. शंका असल्यास अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधा. विनामूल्य हेल्पलाईन: 1800112100ग्राहक सतर्क राहिल्यास भेसळ रोखणे शक्य आहे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
