कन्नड तालुक्यातील अवघी चार हजार लोकवस्ती असलेल्या 'नाचनवेल' या गावाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जगभरात जाती, धर्म, पंथावरून वादंग व युद्ध होत असल्याचे आपण पाहतो. पण, नाचनवेल गावात हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या व्यक्ती एकोप्याने राहतात, अशी माहिती ग्रामस्थ विठ्ठल थोरात यांनी लोकल 18 शी सोबत बोलताना दिली.
advertisement
अंजना नदीच्या तीरावर वसलेल्या या गावातील ग्रामस्थांसाठी हा कार्यक्रम दिवाळी सणापेक्षाही मोठा असतो. या कार्यक्रमासाठी सासरी असलेल्या लेकीबाळी आणि नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले लोक आवर्जून गावात हजेरी लावतात.
सर्व सुविधांनी युक्त गाव
गावात हनुमान मंदिर आणि मशीद एकमेकांच्या शेजारी आहे. ग्रामस्थांची एकजूट, धर्मनिरपेक्षता, गावातील स्वच्छता आणि विकासकामांमुळे हे गाव कौतुकाचा विषय बनले आहे. नाचनवेल, कोपरवेल या दोन्ही गावांत जिल्हा परिषदेच्या दहावीपर्यंत शाळा आहे. गावात अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाचनालय इत्यादी सर्व सोयी-सुविधा आहेत.