Temple: महाराष्ट्रातील स्वयंभू शिवलिंग असणारे मंदिर, किल्ला देवस्थान म्हणून आहे ओळख, इतिहास काय? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
या मंदिराच्या नावात किल्ला असा उल्लेख करण्याचे कारण हेच की हे मंदिर जलालखेडा येथील आमनेर किल्ल्याच्या आतमध्ये आहे. अतिक्रमण आणि बऱ्याच गोष्टींमुळे आता किल्ल्याचे अवशेष खूप कमी आहेत.
नागपूर : विदर्भात अनेक पुरातन शिव मंदिरे आहेत. त्यातीलच एक असलेले अतिप्राचीन शिव मंदिर हे नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा गावात आहे. नागपूरवरून 80 किमी अंतरावर असलेल्या जलालखेडा येथे अतिप्राचीन शिव मंदिर आहे. ते शिव मंदिर जलालखेडा येथील श्री सोमेश्वर मंदिर किल्ला देवस्थान या नावाने ओळखले जाते. या मंदिराच्या नावात किल्ला असा उल्लेख करण्याचे कारण हेच की हे मंदिर जलालखेडा येथील आमनेर किल्ल्याच्या आतमध्ये आहे. अतिक्रमण आणि बऱ्याच गोष्टींमुळे आता किल्ल्याचे अवशेष खूप कमी आहेत. तरीही किल्ला ही ओळख कायम राहावी यासाठी त्याठिकाणी थोडे बांधकाम करून विविध मंदिरांची उभारणी केली आहे. त्याठिकाणी असलेले शिव मंदिर हे स्वयंभू असून अतिप्राचीन असल्याचं तेथील नागरिक सांगतात.
स्वयंभू शिवलिंग असणारे मंदिर
श्री सोमेश्वर मंदिर किल्ला देवस्थान याबाबत माहिती देताना तेथील पुजारी चंद्रकुमार आष्टीकर सांगतात की, हे मंदिर निजामशाहीच्या आधीचे असून या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू असल्याची माहिती आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार 1970 मध्ये झालेला आहे. हे मंदिर आधी या किल्ल्याच्या बाहेर होते. किल्ल्याचं भव्य प्रवेशद्वार जे आता आपल्याला बघायला मिळत त्याला सिमेंटने बनवले आहे. आधीचे कोणतेही अवशेष या किल्ल्यात आपल्याला बघायला मिळत नाहीत. या मंदिरात जाण्यासाठी आधी नदी पार करावी लागत होती. आता बांधकाम केल्यामुळे भक्तांसाठी सोयी झालेल्या आहेत, असे ते सांगतात.
advertisement
त्रिवेणी संगमावर मंदिर
हे शिवमंदिर त्रिवेणी संगमावर आहे. जाम नदी, वर्धा नदी आणि मधाड नदी या तिन्ही नद्यांचा संगम याठिकाणी होतो आणि पुढे अप्पर वर्धाला जाऊन मिळतो. त्रिवेणी संगम असल्यामुळे भक्तांची अपार श्रद्धा आहे. हे शिव मंदिर साक्षात आहे. असं म्हणतात की, याठिकाणी शिवलिंग सोन्याचं होतं. त्या भोवताली सापांची गर्दी असायची. पुढच्या जन्मात आपल्याला कशाचा जन्म मिळणार हे याठिकाणी समजत असल्याचं जुने लोकं सांगतात. ते शिवलिंग चोरण्यासाठी चोरांनी प्रयत्न केला. पण, सापांच्या प्रकोपामुळे ते यशस्वी झाले नाहीत, असंही जुने लोकं सांगतात.
advertisement
मंदिराच्या बाजूला गणेश मंदिर
शिवमंदिराच्या अगदी बाजूला गणपती आणि हनुमानाची साक्षात मूर्ती आहे. ही मूर्ती देखील शिवमंदिराच्या सोबतची असल्याचं सांगतात. त्याचबरोबर शिव मंदिराच्या बाहेर नंदी आणि दोन पहारेकरी रक्षक आहेत. त्यामुळे यामंदिराची शोभा आणखी वाढते. याठिकाणी विविध पूजाविधी देखील केल्या जातात, असे त्यांनी सांगितले.
किल्ल्याचा इतिहास काय?
जलालखेडा येथील हा किल्ला गोंड राज्याच्या काळात बांधलेला आहे. त्यानंतर मोहना राणीने याठिकाणी राज्य केले. त्यानंतर नागपूरकर भोसले यांचा ताबा या किल्ल्यावर होता. त्यानंतर ब्रिटिशांच्या ताब्यात हा किल्ला गेला. जवळपास 300 ते 350 वर्षांचा इतिहास असलेला हा किल्ला आहे, असं गावकरी सांगतात.
advertisement
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
August 01, 2025 8:02 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Temple: महाराष्ट्रातील स्वयंभू शिवलिंग असणारे मंदिर, किल्ला देवस्थान म्हणून आहे ओळख, इतिहास काय? Video