TRENDING:

Shardiya Navratri 2025: 500 मूर्ती अन् 8 कामगार, नवरात्रोत्सवात मूर्तीकाराची अशीही कमाई

Last Updated:

Shardiya Navratri 2025 : वडिलोपार्जित व्यवसायाला चालना देण्याचे काम चिकलठाणा येथील सुजल पलई करत आहे. ते देवींची मूर्ती बनवण्याचे काम करतात त्यांच्याकडे दीड फुटांपासून ते सहा फुटांपर्यंत विविध आकाराच्या 500 देवींच्या मूर्ती तयार केल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : वडिलोपार्जित व्यवसायाला चालना देण्याचे काम चिकलठाणा येथील सुजल पलई करत आहे. ते देवींची मूर्ती बनवण्याचे काम करतात त्यांच्याकडे दीड फुटांपासून ते सहा फुटांपर्यंत विविध आकाराच्या 500 देवींच्या मूर्ती तयार केल्या आहेत. पलई यांच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात 8 कामगार आहे. त्यांना देखील रोजगार मिळाल्याने ते समाधानी आहेत, यंदा नवरात्रोत्सवामुळे त्यांच्या मोठ्या प्रमाणात देवींच्या मूर्ती बुक झाल्या आहे.
advertisement

नवरात्रोत्सवाच्या सीजनमध्ये या व्यवसायाच्या माध्यमातून जवळपास 10 ते 15 लाख रुपयांची उलाढाल होते आणि सर्व खर्च वजा करून 6 ते 7 लाख रुपये निव्वळ नफा मिळत असल्याचे असल्याचे पलई यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले. दरवर्षी गणेशोत्सव सीजन तसेच नवरात्रोत्सवामध्ये विविध देवी - देवतांच्या मूर्ती तयार करण्याचे काम सुजल पलई करत असतात. विशेषतः ते बीकॉम ग्रॅज्युएशनचे शिक्षण करत वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळण्याचे देखील काम करत आहे.

advertisement

सुजलच्या मदतीसाठी वडील सुभाष पलई तसेच त्यांची आई आणि भाऊ असे संपूर्ण कुटुंब या \'मूर्ती\' तयार करण्याच्या कामात आपला हातभार लावतात. देवी - देवतांच्या मूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा (पीओपी) वापर केला जातो कारण मातीची मोठी मूर्ती तयार करणे कठीण असते, मातीची मूर्ती तयार जरी केली तर त्यासाठी पीओपी मूर्तींच्या तुलनेत मेहनत जास्त प्रमाणात असते. तसेच मातीची मूर्ती महाग देखील असते त्यामुळे मोजक्याच प्रमाणात या मूर्तींची विक्री होते. तर जास्त प्रमाणात पीओपी मूर्तींची विक्री केली जाते व 1000 रुपयांपासून ते 18000 रुपयांपर्यंत मूर्ती उपलब्ध असल्याचे पलई यांनी म्हटले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Shardiya Navratri 2025: 500 मूर्ती अन् 8 कामगार, नवरात्रोत्सवात मूर्तीकाराची अशीही कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल