प्रणिता कुलकर्णी यांनी सुरवातीला हाताने बनवलेल्या शेवया, पापड, हळद-तिखट विकायला सुरवात केली. स्वतःच घरोघरी जाऊन वस्तू विकल्या. नातेवाईकांनी त्यावेळेला म्हणायचे गृह उद्योग करणं आपले काम आहे का? सह असे अनेक टोमणे वैगेरे खाऊन आणि अनेक अडचणींना सामोरे जात हा व्यवसाय उभा केला आहे. लोकांनी देखील प्रणिता यांच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद दिला. पदार्थांची मागणी वाढू लागली आणि प्रणिता यांचे धैर्यही! मग दागिने मोडून त्यांनी शेवयांची मशीन घेतली, उत्पादन वाढवले आणि 'पुष्कर गृह उद्योग' या नावाने आपली स्वतःची ओळख निर्माण केली.
advertisement
मार्केटिंगचे कोणतेही साधन नव्हते, पाठिंबाही नव्हता; पण सातत्य आणि मेहनत होती. त्यातूनच छत्रपती संभाजीनगर, जालना, सेलू, परभणी, जळगाव, मुंबई आणि पुण्यापर्यंत त्यांच्या उत्पादनांचा प्रसार झाला. उन्हाळ्यात शेवया, कुरडया, पापड, पापड्या तर दिवाळीत चिवडा, लाडू, बाकरवडी, शंकरपाळे, चकली, अनारसे यांचा सुगंध घराघरांत पोहोचतो. नवरात्री आणि महालक्ष्मी उत्सवात उपवासासाठी लागणारे भगर, राजगिरा, शेंगदाणे लाडू, थालीपीठ पीठ हे सगळं पदार्थही 'पुष्कर गृह उद्योग'मध्ये मिळतात. 'गृह उद्योग' व्यवसाय करण्यासाठी सर्वप्रथम जिद्द पाहिजे, मेहनत करण्याची स्वतःची तयारी पाहिजे, व्यवसायामध्ये प्रचंड कष्ट करावे लागतात तसेच सातत्य राखून ठेवणे महत्त्वाचे आहे. अशी प्रतिक्रिया देखील कुलकर्णी यांनी दिली.