नेमके घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 10 नोव्हेंबर रोजी दुकानात असलेल्या दागिन्यांची नेहमी प्रमाणे तपासणी होत होती. दरम्यान हे काम सुरु असताना एका ट्रेतील दोन अंगठ्या खोट्या असल्याचे लक्षात आले. मग काय तात्काल त्यांनी मागील काही दिवसांत सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. हे सीसीटीव्ही पाहत असताना त्यांना दिसून आले की, 28 ऑक्टोबर रोजी दुपारी ग्राहक म्हणून आलेल्या महिलेने अंगठ्या दाखविण्याची मागणी केली होती.
advertisement
महिला कर्मचारी इतर ट्रे काढण्यासाठी बाजूला गेल्यावर तिने आपल्या हातातील दोन खोट्या अंगठ्या ट्रे मध्ये ठेवल्या आणि त्यातील खऱ्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या अंगठ्या त्यांच्याकडे लपवल्या मग वस्तू न घेता तेथून त्यांनी पळ काढला.
पोलिसांनी 14 दिवसांच्या तपासानंतर आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेमुळे नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, विशेषतः ज्वेलरी खरेदी करताना. पोलिसांनी नागरिकांना फसवणूक आणि चोरीसंबंधी तातडीने तक्रार करण्यास सांगितले आहे.
