TRENDING:

औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती, हिंदू संघटनांचा इशारा, खुलताबादला पोलीस छावणीचं रुप

Last Updated:

Aurangzeb Tomb Kabar Khultabad: महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर नको म्हणत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू, असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिल्यानंतर खुलताबादला पोलीस छावणीचं स्वरुप आलेले आहे. हिंदू संघटनांच्या इशाऱ्यानंतर आगाऊ खबरदारी म्हणून खुलताबाद येथील कबरीला पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
औरंगजेब कबर
औरंगजेब कबर
advertisement

महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर नको म्हणत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाले आहेत. औरंगजेबाच्या कबरी विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन विश्व हिंदू परिषदेकडून आता राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

मुघल सम्राट औरंगजेब याच्या कबरीबद्दल आंदोलने केली जात आहेत. खुलताबाद येथे असलेली औरंगजेब याची कबर उखडून टाकण्याची धमकी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी दिली आहे. त्यामुळे खुलताबाद येथील कबरीला पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.राज्य राखीव दलाची तुकडी आणि राज्याचे जलद कृती दल देखील या ठिकाणी ठेवण्यात आले आहे..

advertisement

महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती

शिवजयंती म्हणजेच 17 मार्च रोजी विश्व हिंदू परिषद राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कबर हटवा या मागणीसाठी आंदोलन करणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यादिवशी निवेदन देखील देण्यात येणार आहे. राज्यभर एकाच दिवशी एकाच वेळी हे आंदोलन होणार असून जर या आंदोलनानंतर सरकारने कबरीबाबत निर्णय घेतला नाही तर आम्ही बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करत ती कबर हटवू, असा इशारा बजरंग दलाने पुण्यात दिला आहे.

advertisement

औरंगजेब बादशाहची खुलताबादला कबर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडतेय? शरिराला लावा तिळाचे कोमट तेल, होतील हे फायदे
सर्व पहा

औरंगजेब बादशाहची कबर महाराष्ट्रातील खुलताबाद (औरंगाबादजवळ) आताच्या छत्रपती संभाजीनगर स्थित आहे. ही कबर विशेष आहे कारण ती मुघल सम्राटाच्या वैभवाला विसरून साधेपणाने बांधण्यात आली आहे. औरंगजेबाची इच्छा होती की त्याच्या मृत्यूनंतर त्याची कबर साधेपणाने बांधली जावी. त्यामुळे इतर मुघल सम्राटांप्रमाणे आलिशान मकबऱ्याऐवजी त्याची कबर मातीच्या थराखाली ठेवली गेली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती, हिंदू संघटनांचा इशारा, खुलताबादला पोलीस छावणीचं रुप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल