सात लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आयशाचा छळ केला जात असल्याचा गंभीर आरोपही नातेवाइकांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी आयशाने सुसाइड नोट लिहिल्याचेही समोर आलं आहे. सुसाईड नोटमध्ये तिने आपली व्यथा मांडली आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात पती व सासरच्या मंडळींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अरबाज सलीम शेख, सासू सायरा सलीम शेख आणि अलीम सलीम शेख अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
advertisement
आयशाने सुसाईड नोटमध्ये काय म्हटलं?
आयशा सुसाईड नोटमध्ये म्हणाली, "मी खूप त्रासले आहे. अरबाज आणि त्याच्या घरचे मला खूप त्रास देत आहेत. मी पण एक माणूस आहे. माझंही एक जीवन आहे. इच्छा आहेत. पण आता तोच (अरबाज) माझ्या आयुष्यात नाही. आता फक्त मुलंच माझ्या आयुष्यात आहेत. त्यांनाच मला बघायचं आहे. आय हेट माय लाईफ. आता माझ्या हृदयात कुणीही नाहीये ना कुणाच्या हृदयात मी आहे."
"जर कुणाला हृदयात ठेवायचं असेल तर हृदयापासून ठेवा, केवळ मन राखण्यासाठी कुणाला हृदयात ठेवू नका. मी लग्न करून फसली आहे. मी लग्न का केलं? माझी चांगली लाईफ होती. पण आता बघा... मला त्याच्यात काहीच इंटरेस्ट राहिला नाही, कारण तो माझ्यावर प्रेम करत नाही. आता मी केवळ माझ्या मुलांसाठी जगत आहे. असं नाही की मी प्रेम नाही केलं, खूप जास्त केलं, पण त्याबदल्यात मला फक्त दु:ख मिळालं. मी कुणाला काही बोलूही शकत नाही. आता माझा भरोसा उठला आहे. तो सारखा सोनी सोनी सोनी करत राहतो. पण सोनीचं नाव ऐकून माझं डोकं खराब होतं. जाऊ द्या आता काय बोलायचं", असंही तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
