TRENDING:

Badlapur News: पोलीस स्टेशनबाहेरच शिंदे गटाचा राडा, भाजप उमेदवाराच्या लेकाला चोपलं, पोलिसांचा लाठीमार

Last Updated:

Shiv Sena Shinde BJP Clash : शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवाराच्या मुलाला चोपलं असल्याची घटना घडली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

advertisement
बदलापूर : स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मतदाना दिवशी बदलापूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळी भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्याचा वाद शांत होईपर्यंत दुसरी घटना समोर आली आहे. बदलापूर पोलीस ठाण्याच्या बाहेरच शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवाराच्या मुलाला चोपलं असल्याची घटना घडली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
पोलीस स्टेशनबाहेरच शिंदे गटाचा राडा, भाजप उमेदवाराच्या लेकाला चोपलं, पोलिसांचा लाठीमार
पोलीस स्टेशनबाहेरच शिंदे गटाचा राडा, भाजप उमेदवाराच्या लेकाला चोपलं, पोलिसांचा लाठीमार
advertisement

बदलापूर नगर परिषदेसाठी आज मतदान पार पडत आहे. सहा जागांवरील मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने ४३ जागांवर इथे मतदान होत आहे. आज सकाळच्या सुमारास भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. या वादावादीनंतर दोन्ही गटात हाणामारी झाली. पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. या वादानंतर बदलापूरमध्ये काही वेळेसाठी तणाव निर्माण झाला होता.

advertisement

सकाळच्या वादानंतर काही तासामध्ये पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले. भाजप उमेदवार रमेश सोळंके यांच्या मुलाला शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे समोर आले. पोलीस स्टेशनबाहेरच आणि पोलीस बंदोबस्त असतानाही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोळंके यांच्या मुलाला हाणलं असल्याची घटना घडली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात चढ-उतार, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

या घटनेनंतर भाजप आणि शिंदे गटात मोठा तणाव निर्माण झाला आहे. आज सकाळीदेखील बदलापूर पश्चिमेतील गांधी नगर टेकडी परिसरातील एसटी बसस्टँड जवळ भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये अचानक जोरदार वाद झाला होता. त्यानंतर काही वेळातच हा वाद वाढला आणि जोरदार राडा झाला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप-शिंदे गटामध्ये तणावाची स्थिती दिसून आली होती. आता निवडणुकीत हा वाद चांगलाच वाढला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Badlapur News: पोलीस स्टेशनबाहेरच शिंदे गटाचा राडा, भाजप उमेदवाराच्या लेकाला चोपलं, पोलिसांचा लाठीमार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल