अक्षय शिंदेने गोळीबार केल्यानंतर त्या परिस्थितीमध्येही निलेश मोरे यांनी अक्षयवर हल्ला केला. संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांच्या जीपमध्ये असलेले दुसरे अधिकारी, पोलीस निरिक्षक संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. संजय शिंदे यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वहरमधून अक्षय शिंदेवर दोन गोळ्या फायर केल्या. यातील एक गोळी अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरिरावर लागली आहे.
advertisement
गोळीबारामध्ये जखमी झालेला अक्षय शिंदे आणि एपीआय निलेश मोरे यांना कळव्याच्या शिवाजी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यामध्ये अक्षयचा मृत्यू झाल्याची खात्रीलायक माहिती आहे, पोलिसांनी मात्र अद्याप दुजोरा दिलेला नाही. अक्षयने गोळीबार करेला तेव्हा गाडीमध्ये त्याच्यासोबत पोलीस पथकातले चार जण होते, ज्यात दोन अधिकारी आणि दोन अंमलदार होते.