कुंबेफळ येथे बळीराम लांडगे गाय पालन व्यवसाय करत असून त्यांच्याकडच्या 11 जनावरांना सकाळी 6 वाजता चारा खाण्यासाठी गोठ्यात सोडले जाते. मुक्त गोठा पद्धत असल्यामुळे दिवसभर या गाई गोठ्यातच मोकळ्या राहतात. या गाईंच्या माध्यमातून निघणाऱ्या दुधाची घरोघरी विक्री केले जाते तसेच दूध संकलन केंद्रावर देखील दिले जाते. तसेच ते या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून चांगली कमाई देखील करतात. त्यामुळे त्यांच्याकडे परिसरातील शेतकरी दुग्ध व्यवसायाची माहिती घेण्यासाठी येत असल्याचे देखील दांडगे यांनी सांगितले.
advertisement
गाय पालन व्यवसाय कसा सुरू करावा?
प्रत्येकाची वेगळी पद्धत असते कुणाकडे गुंतवणूक करण्याची क्षमता असेल तर चांगला सेटअप देखील उभा करता येतो. तसेच कमी म्हटलं तर तीन ते चार गाईंपासून सुरुवात करता येते. व्यवसायातील वाटचाल पाहून पुढे आणखी जनावरांचा समावेश यामध्ये करता येतो. दुग्ध व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी कमी जनावरांपासून सुरुवात करावी, गोठ्याची आणि योग्य खाद्याची व्यवस्था करावी, गायपालन, या व्यवसायामध्ये सातत्य असणे महत्त्वाचे आहे. या व्यवसायामध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्यास आणखी जनावरांची वाढ करता येऊ शकते.