याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खराडीतील मणिपाल हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली. या रुग्णाची हृदयातील महाधमनीची (Aorta) झडप खराब झाली होती. याशिवाय ही महिला लठ्ठपणा, हाय ब्लडप्रेशर, थायरॉईड, श्वसनविकार यासह इतर अनेक आजारांचा सामना करत होती. या कारणास्तव तिची ओपन हार्ट सर्जरी करणे फारच धोक्याचं होते. त्यामुळे डॉक्टरांनी या महिलेवर ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (टावी) प्रक्रियेसह बलून असिस्टेड बॅसिलिका शस्त्रक्रिया केली.
advertisement
Full Body Checkup : फुल बॉडी चेकअप करायचंय? थांबा! तज्ज्ञांकडून ऐका, कोणी-केव्हा आणि का करावं..
संबधित महिलेच्या हृदयातील महाधमनीची झडप खराब झाली होती. महाधमनी ही आपल्या हृदयातून संपूर्ण शरीराकडे रक्त वाहून नेणारी मुख्य नलिका असते. ती बदलण्यासाठी सामान्यपणे ओपन हार्ट सर्जरी केली जाते. मात्र, संबंधित महिलेसाठी तो पर्याय वापरला असता तर तिला अपंगत्व किंवा मृत्यू येण्याची शक्यता जास्त होती. शिवाय, या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरा होण्यास जास्त कालावधी लागतो. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी कमीत कमी चिरफाड होणाऱ्या प्रक्रियेला प्राधान्य दिलं. डॉक्टरांनी त्यांना ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटचा (टावी) पर्याय सुचवला.
मणिपाल हॉस्पिटलमधील हार्ट स्पेशालिस्ट असलेल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, टावी प्रक्रियेमध्ये झडपेच्या खराब झालेल्या पाकळ्यांचं विभाजन करण्यासाठी बलूनच्या आधारे इलेक्ट्रक गाईडवायरचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे रक्त मोकळेपणाणे वाहून आणि झडपांना धमनीतील रक्तप्रवाहात अडथळा आणण्यापासून थांबवता आलं. त्यानंतर खराब झालेल्या महाधमनी झडपेच्या ठिकाणी नवीन झडप बसवण्यात आली. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पायावाटे, बाहेरून एकही टाका न घालता पार पडली. विशेष म्हणजे रुग्णाला चौथ्या घरी देखील पाठवण्यात आलं.