TRENDING:
LIVE NOW

Ajit Pawar Plan crash Live Update: सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे बारामतीकडे रवाना

Last Updated:

Ajit Pawar Plan crash Live Update: बारामतीत अजित पवारांच्या विमानाला भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. आज अजित पवार बारामती दौऱ्यावर होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बारामतीत अजित पवारांच्या विमानाला भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. आज अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळतेय. या अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. सुप्रिया सुळे या दिल्लीतून बारामतीकडे निघाल्या आहेत. बारामतीत आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्त अजित पवारांच्या सभा आयोजित करण्यात आली होती. या घटनेचे क्षणाक्षणाचे अपडेट्स वाचा लाईव्ह
News18
News18
advertisement
Jan 28, 202611:13 AM IST

मोठा भाऊ हरपला,- एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहली श्रद्धांजली
अतिशय मनाला चटका लावणारी आजची दुर्दैवी घटना दादांच्या जाण्याने झालीय. कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल. अजित दादा गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते. अतिशय परखड आणि स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली पकड संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. प्रत्येक गोष्टीचा बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होते. रोखठोक बोलणारे असले तरी अतिशय मनाने ते निर्मळ होते याचा अनुभव मी घेतला आहे. मी मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री होते तेव्हा लाडकी बहीण योजना इतर योजना सुरू केल्या तेव्हा आर्थिक घडी आहे, आर्थिक तरतूद उत्कृष्टपणे त्यावेळी केली होती याचा अनुभव मला आहे. एकदा करायचं ठरवलं की ते करायचे, करतो बघतो पाहातो असं त्यांचं कधीही नसायचं, आम्ही टीम म्हणून काम केलं. आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या आहेत. अजित दादा पहाटे लवकर काम करायचे. अतिशय महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपला. खर म्हणजे काल परवाच आमची एका कार्यक्रमात आमची भेट झाली. सरन्यायाधीश मुंबईत आले होते ते येण्यापूर्वी आमची भेट झाली. त्यावेळी आमच्या चर्चा गप्पा गोष्टी झाल्या. आज जेव्हा मला बातमी कळली तेव्हा परवाच्या भेटीची आठवण पटकन डोळ्यासमोर आली. माझ्यापेक्षा ते राजकारणातील अनुभवती नेते, राजकारण, वयाने सगळ्याच बाबतीत मोठे होते. राजकारणातील अनेक विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्याचा फायदा मंत्रिमंडळात व्हायचा. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबियांचंच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं न भरुन येणारं नुकसान झालं आहे. माझ्या पेक्षा वयानं मोठे असल्यामुळे जे काही आमची जवळीक निर्माण झाली होती राजकारणातले आम्ही एक टीम म्हणून काम करत असलो तरीसुद्धा एक मोठा भाऊ म्हणून माझ्यासाठी होते. मोठा भाऊ हरपल्याची भावना त्याचं दु:ख माझ्या मनात आहे. मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. उपमुख्यमंत्री शिंदेंचे शब्द बोलताना अडखळले, त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यांनी आवंढा गिळला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Jan 28, 202611:00 AM IST

जळगाव संजय पवार याचे अश्रू अनावर

जळगाव संजय पवार याचे अश्रू अनावर
Jan 28, 202610:55 AM IST

40 मिनिटांचा प्रवास, अखेरच्या क्षणी अनर्थ, पायलटही हतबल, अजित पवारांच्या विमानासोबत नक्की काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या विमानाने सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईतून टेक ऑफ केलं होतं. हे विमान ४० मिनिटांत बारामती विमानतळाजवळ पोहोचलं. 40 मिनिटांचा प्रवास, अखेरच्या क्षणी अनर्थ, पायलटही हतबल
Jan 28, 202610:54 AM IST

अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी धक्कादायक आहे- सतेज पाटील

अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी धक्कादायक आहे. राज्याचं ऐक कर्तृत्ववान नेतृत्व हरपल आहे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
Jan 28, 202610:50 AM IST

सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार पार्थ पवार चार्टर्ड विमानाने पुण्यासाठी रवाना

प्रफुल पटेल सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार पार्थ पवार चार्टर्ड विमानाने पुण्यासाठी रवाना तिथून ते बारामतीला जाणार
advertisement
Jan 28, 202610:49 AM IST

अजित दादाच्या निधनाची बातमी पाहून दादाच्या राष्ट्रवादीचे आमदार धायमोकुळून रडले

अजित पवार यांच्या मृत्युची बातमी ऐकून आमदार प्रताप पाटील चिखलीकर धायमोकळून रडले ..
राष्ट्रवादीचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अश्रू नाववर झाले ..नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत प्रताप पाटील चिखलीकर.. दरम्यान अजित दादांच्या मृत्यूची बातमी कळताच चिखलीकर तातडीने बारामतीकडे रवाना झाले ..
Jan 28, 202610:49 AM IST

Ajit Pawar died in plan crash: ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्या प्रति ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आडम मास्तर यांनी अजित पवार यांच्या जाण्याचे दुःख व्यक्त केलं..
Jan 28, 202610:48 AM IST

आमचा कुटुंबप्रमुख हरवला..आमदार प्रकाश सोळंके

बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची प्रतिक्रिया. आमदार प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना. – बीड जिल्हा सह माजलगाव मतदार संघाचे मोठे नुकसान.
– आमचा कुटुंबप्रमुख गेला..
– खूप मोठ्या आठवणी आहेत.
advertisement
Jan 28, 202610:47 AM IST

महाराष्ट्रासाठी आजचा हा काळा दिवस- संजय गायकवाड

महाराष्ट्रासाठी आजचा हा काळा दिवस आहे… आमदार संजय गायकवाड यांच्या भावना… अजित दादांच्या निधनाच्या बातमीने आमदार संजय गायकवाड भाऊक… बाईट – संजय गायकवाड, आमदार बुलढाणा
Jan 28, 202610:39 AM IST

Ajit Pawar Plan crash Live Update: आमदार रोहित पाटील आमदार बारामतीकडे रवाना

सांगली जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते बारामतीकडे रवाना झाली आहेत,आमदार जयंत पाटील आमदार रोहित पाटील आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी बारामतीला रवाना झाली आहेत, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हे देखील रवाना झाले आहेत
Jan 28, 202610:33 AM IST

आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला शोक

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विषयीची दुःखद बातमी समजली. खरंतर हा फार मोठा आघात झाला आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
advertisement
Jan 28, 202610:32 AM IST

अजित पवार यांच्या निधनानंतर राजकारणात शोककळा

युगेंद्र पवार ढसाढसा रडले, हसन मुश्रीफ, अनोल मिटकरी यांना अश्रू अनावर
Jan 28, 202610:26 AM IST

अपघात कसा झाला? चौकशी करा, संजय राऊत यांची मागणी

अजित पवार विमानाने सतत प्रवास करत असतात, असा अचानक अपघात कसा झाला याची चौकशी झाली पाहिजे- संजय राऊत
Jan 28, 202610:23 AM IST

Ajit Pawar Death: 'काका गेले', युगेंद्र पवारांना अश्रू आवरेना, हॉस्पिटलमधला VIDEO समोर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अजित पवारांचं निधन झालं आहे.

‘काका गेले’, युगेंद्र पवारांना अश्रू आवरेना, हॉस्पिटलमधला VIDEO समोर
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plan crash Live Update: सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे बारामतीकडे रवाना
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल