तडोळी येथील शेतकऱ्याला मारहाण करत गंभीर जखमी केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारावाई करण्यात आली आहे. रघुनाथ फड, जगन्नाथ फड, सुदीप सोनावणे , बालाजी दहिफळे, विलास गित्ते, धनराज उर्फ राजेभाऊ फड आणि ज्ञानदेव उर्फ गोट्या गित्ते या सात जणांच्या टोळीवर मकोका लावण्यात आला आहे. या टोळीने आजपर्यंत संघटितरीत्या पो. स्टे. परळी शहर, संभाजीनगर आणि अंबाजोगाई ग्रामीण हद्दीत एकूण 10 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
advertisement
आरोपींवर कोणते गुन्हे दाखल?
विशेष म्हणजे मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेले सर्व गुंड वाल्मिक कराडचे समर्थक आहे. एवढंच नाही तर ज्यावेळी वाल्मिकला पुण्याहून बीडला आणण्यात आले त्यावेळी गोट्या गित्ते हा त्यांच्या ताफ्यात होता. तर सुदीप सोनवणे हा बीड कारागृहात कराड आणि गित्ते गँग यांच्या झालेल्या वादाचे कारण होता. या टोळीतील गोट्या गित्ते आणि धनराज उर्फ राजेभाऊ फड हे दोन आरोपी फरार आहेत. तसेच या टोळीने अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, दंगा करणे, कट रचणे, अवैध शस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे, दरोडा टाकणे, रस्ता अडवणे, मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, गंभीर दुखापत करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
परळीच्या तडोळी येथील सहदेव वाल्मीक सातभाई ट्रॅक्टरचे काम करण्यासाठी आणि हप्ता भरण्यासाठी 2 लाख 70 हजार रुपये घेऊन मोटार सायकलवर चालले होते. परळीच्या शिवाजी चौकातून सातबारा आणण्यासाठी जलालपूर रोडवरील तलाठी कार्यालयाकडे जात होते. दरम्यान त्याचवेळी आरोपींनी पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ वाटेत आडवी घातली. स्कॉर्पिओमधून एका वेळी सात ते आठ जण काठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन उतरले आणि सातभाई यांना गाडीवरून ओढत खाली पाडले. सातभाई यांना खाली पाडल्यानंतर त्यांच्या तोंडावर आणि पाठीवर काठीने सपासप वार केले तसेच लोखंडी रॉडने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर मारले. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले त्यानंतर त्यांच्या पॅन्टच्या खिशातील २ लाख ७० हजार रुपये काढून घेतले,