बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याने देखील तुरुंगातून सुटल्यानंतर वाल्मीक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा केला होता. एकूणच वाल्मीक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप होत असताना, आता कारागृह अधीक्षक बक्सार मुलाणी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता कारागृह अधीक्षक म्हणून रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार आहेत.
advertisement
संतोष देशमुख कुटुंबातील सदस्यांनी वाल्मीक कराडसह इतर आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप केला होता. यातच कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी हे देखील चर्चेत होते. आता अशातच त्यांची बदली करण्यात आली आहे. बक्सार मुलाणी हे गेल्या तीन वर्षांपासून बीडमध्ये कार्यरत होते. त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही बदली झाल्याची माहिती आहे
परंतु कारागृह प्रशासनावर झालेले आरोप आणि त्यानंतर झालेली ही बदली, याची आता उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. मुलाणी यांची लातूर कारागृहाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लातूरच्या कारागृहातही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी विष्णू चाटे आहे.