बीडच्या परळी तालुक्यातील बोधेगाव येथे विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी संभाव्य युतीचे संकेत दिले. ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद… आम्ही कोणतीही निवडणूक हलक्यात घेत नाही. माझी आणि ताई (पंकजा मुंडे) यांची राज्यात महायुतीची सत्ता आहे. या संदर्भात चर्चा झाली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीतही भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढेल, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
advertisement
धनंजय मुंडे यांनी म्हटले की, माझी आणि पंकजाताईंची चर्चा झाली आहे. आणखी पूर्ण चर्चा होणे बाकी आहे. त्यामुळे इच्छुक आहेत त्यांनी निश्चिंत राहावे असेही मुंडे यांनी म्हटले. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास शिंदे गटाला स्वबळ अथवा मुंडे बहीण-भावांच्या निर्णयासमोर नमतं घ्यावं लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचेही या संभाव्य युतीकडे लक्ष लागले आहे.
मुंडे बहिण-भाऊ हे लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूकीत एकत्र दिसले होते. आता नगरपालिका व जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूकीतही एकत्र आल्यास विरोधकांना कडवी झुंज द्यावी लगणार आहे.