भ्रष्टाचारासंदर्भात पुन्हा कुठे आवाज काढला किंवा वरिष्ठांकडे तक्रार केली तर जिवे मारून टाकू अशी धमकीही दिली. या मारहाणीत तक्रारदार अमर गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ देखील आता सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
कडक कारवाईचा इशारा
advertisement
बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी बीड पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून घेत प्रतिबंधात्मक कारवाया करून यापुढे गुन्हे केल्यास तडीपार, एमपीडीए, मकोकासाख्या गुन्ह्याची तंबी दिली जात आहे. याअगोदर वाळू माफियांसह गुंडांना बोलावून घेत परेड घेतली होती. शांतता ठेवा, अन्यथा कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला.
बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
बीडमध्ये वाढती गुन्हेगारी अतिशय गंभीर आहे. काही केल्या त्याला आळा बसत नाही. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातून अजूनही पोलिसांनी कोणताही धडा घेतलेला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच गुंडांची धमक वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. हे कधी थांबेल? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. .या घटनेमुळे पुन्हा एकदा बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
