दिपक शिवाजी नालकोल वय (वर्ष 20) असे मृत तरुणाच नावे आहे. जखमींवर अहिल्यानगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केले आहे.
एकमेकांच्या विरोधात स्टोरी टाकण्याच्या कारणावरून वाद
आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथील जि.प. शाळेच्या समोर काल तरूणाच्या दोन गटात इन्स्टाग्राम, व्हॉटअॅपवर एकमेकांच्या विरोधात स्टोरी टाकण्याच्या कारणावरून वाद झाला. यात वादाच्या दरम्यान एका गटातील तरूणांनी तिघा जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने तिघे गंभीर जखमी झाले.
advertisement
जखमींची प्रकृती चिंताजनक, आरोपी अटकेत
जखमी तरूणांना उपचारासाठी घेऊन जाताना दिपक नालकोल यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. तर अन्य दोन जखमी तरूणांवर अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
advertisement
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 8:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed: एकमेकांच्या विरोधात सोशल मीडियावर स्टोरी, स्टेटस टाकण्याच्या कारणातून तरुणाचा खून
