TRENDING:

Walmik Karad Ajit Pawar: अजितदादांच्या ताफ्यातील कारने कराडचे सरेंडर, बीडच्या खासदारांचा खळबळजनक आरोप

Last Updated:

Walmik Karad : वाल्मिक कराडने ज्या एसयुव्ही कारमधून सरेंडर केले, ती कार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीडच्या दौऱ्यातील ताफ्यात होती, असा आरोप खासदार सोनावणेंनी केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी, नवी दिल्ली : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यासह राज्याचे राजकारणही ढवळून निघाले आहे. देशमुख यांच्या हत्येला 22 दिवस उलटून गेले तरी अद्यापही सगळ्या आरोपींना अटक करण्यात आले नाही. तर, या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. या सगळ्यात बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी धक्कादायक आरोप केला आहे. वाल्मिक कराडने ज्या एसयुव्ही कारमधून सरेंडर केले, ती कार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीडच्या दौऱ्यातील ताफ्यात होती, असा आरोप खासदार सोनावणेंनी केला आहे.
अजितदादांच्या ताफ्यातील कारने कराडचे सरेंडर,  बीडच्या खासदारांचा खळबळजनक आरोप...
अजितदादांच्या ताफ्यातील कारने कराडचे सरेंडर, बीडच्या खासदारांचा खळबळजनक आरोप...
advertisement

...म्हणूनच संतोष देशमुख यांची हत्या

खासदार बजरंग सोनावणे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना हा आरोप केला. खासदार सोनावणे यांनी म्हटले की, मागच्या महिन्यात जो गुन्हा दाखल होता. तेव्हा जर कारवाई झाली असती तर हे सगळं घडलं नसतं. पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केला असता तरी ही घटना घडली नसती.  आमच्या खंडणी गोळा करण्याच्या कामात जर अडथळा निर्माण केला तर काय होतं हे दाखवण्यासाठीच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा दावाही बजरंग सोनावणे यांनी केला.

advertisement

बजरंग सोनावणे यांनी म्हटले की, संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा आरोपी कराड हा परळीत होता. हत्या झाल्यानंतर आरोपी  आणि पोलिसांची भेट झाली. त्यानंतर हा आरोपी एका नेत्याच्या फार्म हाऊसवर भेटला असल्याचा दावाही सोनावणे यांनी केला. त्यानंतर आरोपी कराड शपथविधीला पोहोचतो आणि तेव्हा अटक का झाली नाही असा सवालही खासदार सोनावणे यांनी केला.

advertisement

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोगचा दौरा केला. त्यावेळी त्यांच्या मस्साजोगच्या दौऱ्याच्या ताफ्यात एक कार होती. त्याच कारमधून हा आरोपी (वाल्मिक कराड) पोलीस स्टेशनला पोहोचला असल्याचा दावाही खासदार सोनावणे यांनी केला. संशियत आरोपी वाल्मिक कराड हा ज्या घरात थांबला, त्याचाही तपास झाला पाहिजे अशी मागणीही सोनावणे यांनी केली.

हत्या प्रकरणातील तीन आरोपी फरार...

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. या तिन्ही आरोपींचा शोध सुरू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत. ल्मिक कराडसाठी हे काम करत असल्याचे म्हटले जात आहे. आता या प्रकरणातील खंडणीचा गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड हा सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर आता या मुख्य आरोपींचा शोध सुरू झाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Walmik Karad Ajit Pawar: अजितदादांच्या ताफ्यातील कारने कराडचे सरेंडर, बीडच्या खासदारांचा खळबळजनक आरोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल