TRENDING:

Beed News : वर्षाला 8 लाखांचा नफा, 500 शेतकऱ्यांना केलं मार्गदर्शन, रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी, VIDEO

Last Updated:

Sericulture success story beed - शिवराज फाटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते 2011पासून रेशीम शेती करतात. त्याचबरोबर त्यांनी रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त कसा फायदा होईल, यासाठी सतत मार्गदर्शन करतात. आजवर त्यांनी रेशीम शेती या व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत पवार, प्रतिनिधी
advertisement

बीड - हळूहळू शेतकरी हे रेशीम शेतीकडे वाटचाल करत आहेत. रेशीम शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवत शेतकरी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवत आहेत. रेशीम शेती करणारे बरेच शेतकरी आपण पाहिले असतील. मात्र, प्रगतशील शेतकरी ज्यांची ओळख आहे, इतकंच नव्हे तर महाराष्ट्र शासनाच्या रेशीम रत्न पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आले आहे, आज त्यांच्याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

advertisement

शिवराज फाटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते 2011पासून रेशीम शेती करतात. त्याचबरोबर त्यांनी रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त कसा फायदा होईल, यासाठी सतत मार्गदर्शन करतात. आजवर त्यांनी रेशीम शेती या व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे.

रेशीम शेती करताना त्यांना झाडांची फवारणी, खुरपण आणि त्याचबरोबर शेडची इतर कामे करण्यासाठी ते वेळोवेळी तत्पर राहतात. हा व्यवसाय सुरू करण्याआधी त्यांना घरूनही तसा प्रतिसाद मिळाला. खास करून कुटुंबातील सर्व सदस्यांनी हा व्यवसाय करण्याकरता शिवराज फाटे यांना पाठबळ दिले. या व्यवसायाची सुरुवात करताना शिवराज फाटे यांना काही अडचणींना तोंड द्यावे लागले. मात्र, त्या अडचणींवर मात करत त्यांनी व्यवसायामध्ये सातत्य ठेवले आणि रेशीम शेतीमध्ये त्यांना यश मिळाले.

advertisement

नवरात्री विशेष : नागपूरच्या काटोल येथील देवींचे आकर्षक देखावे; देवदर्शन अन् पर्यटन दोन्हींचा मिळतो आनंद, VIDEO

रेशीम शेती करण्यापूर्वी शिवराज फाटे ही पारंपारिक शेती करायचे. परंतु काहीतरी वेगळे करण्याची जिद्द उराशी बाळ गुंत्यांनी या व्यवसायामध्ये पाऊल ठेवले. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अगदी चांगली प्रगती केली आहे. फक्त अडीच एकरामध्ये लागवड केलेल्या रेशीम शेतीच्या माध्यमातून शिवराज फाटे हे वर्षाला 7 ते 8 लाख रुपये नफा कमवतात.

advertisement

शिवराज फाटे यांनी तालुक्यातील 400 ते 500 शेतकऱ्यांना रेशीम शेतीबद्दल मार्गदर्शन करत शेतकऱ्यांच्या व्यवसायाला एक वेगळे वळण प्राप्त करुन दिले आहे. रेशीम शेती करताना शेतकऱ्याचे आर्थिक प्रगती होण्यामागे शिवराज फाटे यांचा मोलाचा वाटा आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed News : वर्षाला 8 लाखांचा नफा, 500 शेतकऱ्यांना केलं मार्गदर्शन, रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल