पोरीला पाठवा पैसं पण मिळतील
बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, 24 एप्रिल 2025 रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ नावाच्या महिलेने पीडितेच्या आईशी संपर्क साधला. बदामबाईने 'पायल कलाकेंद्र' येथे नृत्यासाठी मुलींची गरज असल्याचे सांगून, मुलीला नृत्य शिकता येईल आणि तिला चांगले पैसेही मिळतील, असं खोटं आश्वासन दिले.
advertisement
साई लॉजवर नेलं अन् सामुहिक अत्याचार
या आमिषाला बळी पडून पीडितेच्या आईने तिला अंबाजोगाईला पाठवलं. परंतु, पीडितेने 'पायल कलाकेंद्र' येथे राहण्यास नकार दिल्यावर बदामबाई आणि तिच्यासोबतच्या इतर दोघांनी पीडितेला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर बदामबाईने पीडितेला जबरदस्तीने अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेलं. तिथं तिने पीडितेला मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीच्या ताब्यात दिलं आणि ती लॉजवरून निघून गेली. या तिघांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.
अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका
पीडितेने मोठ्या हिमतीने आपल्या आईशी फोनवर संपर्क साधून हा संपूर्ण भयंकर प्रकार सांगितला. घाबरलेल्या आईने तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली आणि तिला बारामतीला परत आणले. यानंतर पीडितेच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात सामूहिक बलात्कार आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा आता पुढील तपासासाठी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस सध्या या सर्व आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
