नेमकं काय झालं?
बीडच्या परळी मध्ये टोकवाडी परिसरातील रत्नेश्वर टेकडी येथे लिंबुटा येथील शिवराज दिवटे (Shivraj Divate beating Video) या युवकाला दहा ते बारा जणांनी रिंगण करून अमानुष मारहाण केली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर आतामध्ये पुन्हा जातीय वातावरण तयार होत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
जातीय रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नका
बीडच्या परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेली मारहाण ही तत्कालिक कारणातून झाली आहे. या प्रकरणाला कुठलाही जातीय रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आले असून दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली.
वीस जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, सन्मित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वगळकर, सुरज मुंडे, स्वराज्य गीते असे दहा आरोपी आणि अनोळखी दहा अशा एकूण वीस जणांवर बीएनएस कलम 109, 126(2), 140(3), 118(1),189(2),189(4),190, 191(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत.
