आलापूर गावात रुक्मीनबाई व रामभाऊ शहाणे हे दाम्पत्य एका पत्र्याच्या झोपडीमध्ये राहतात. रुक्मिणीबाई सकाळी शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या. तर अंध असलेले रामभाऊ आजारी असल्याने घरीच होते. दरम्यान, दुपारी अचानक पत्र्याच्या शेडच पुढील भाग पेटला. धुराचे लोट पाहून गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी काही वेळात आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत रामभाऊ शहाणे यांचा धूराने दम कोंडून आणि आगीत होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
advertisement
वाचा - दिल्लीत इज्रायल एम्बसीजवळ स्फोट, घटनास्थळावर सापडलेल्या पत्रामुळे खळबळ
स्मशानभूमीसाठी आंदोलन
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी अभावी प्रेत शासनाच्या दारी आंदोलन केलं आहे. जिल्ह्यातील 1394 पैकी 656 गावात स्मशानभूमीची सोय नसल्याने मृतदेहाची हेळसांड होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पावसाळ्यात या घटना सर्वाधिक समोर येतात. त्यात वादविवाद होऊन मृतदेहाचे हेळसांड होते. त्यामुळे जिल्ह्यातील स्मशानभूमीची दुरावस्था दूर करून स्मशानभूमी बांधल्या जाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी स्वतःचं प्रेत प्रतिकात्मक स्वरूपात शासनाच्या कार्यालयाबाहेर ठेवले होते. या अनोख्या आंदोलनाची जिल्हाभरात चर्चा देखील होतंय. लवकरात लवकर स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.