तिन दिवसापूर्वी बीड शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर गावाकडे जात असताना सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला केला होता. यात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर खांडे यांचे दोन्ही हात आणि पाय फॅक्चर झाले आहेत. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहे. उपचार सुरू असताना त्यांनी आपली कहाणी सांगताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच न्यायाची भीक मागितली आहे.
advertisement
तर ज्ञानेश्वर खांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात या हल्ल्या संदर्भात कट रचला व मारहाण केली म्हणून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह बारा जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आता यात एकनाथ शिंदे साहेब तुम्हीच न्याय करा आणि माझ्यासारख्या गोरगरीब शिवसैनिकांना न्याय द्या म्हणत उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांनी हाक दिली आहे. नेमकं या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कारवाई करेल. मात्र, शिवसेना शिंदे गट अंतर्गत या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वाचा - 'माझा नवरा भाजप आमदार, मी का राष्ट्रवादी वाढवू?' अजितदादांच्या उमेदवाराचं अजब विधान
नेमकं काय घडलं?
बीड जिल्ह्यात शिंदे गटाच्या शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. 3 एप्रिल रोजी उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे हे गावी जात असताना त्यांची गाडी अडवून लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण झाली होती. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान आता ज्ञानेश्वर खांडे यांच्या तक्रारीवरुन शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह गणेश खांडे, नामदेव खांडे, गोरख शिंदे अशा बाराजणांवर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.