Loksabha Elections 2024 : 'माझा नवरा भाजप आमदार, मी का राष्ट्रवादी वाढवू?' अजितदादांच्या उमेदवाराचं अजब विधान
- Published by:Shreyas
Last Updated:
लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारानी केलेलं अजब विधान चर्चेचा विषय ठरत आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी
धाराशिव : लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारानी केलेलं अजब विधान चर्चेचा विषय ठरत आहे. माझा नवरा भाजपचा आमदार आहे, मी कशाला राष्ट्रवादी काँग्रेस वाढवू? असं वक्तव्य अर्चना पाटील यांनी केलं आहे. मी महायुतीची उमेदवार असून महायुतीतूनच विजयी होणार, असंही अर्चना पाटील म्हणाल्या.
advertisement
धाराशिव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. बार्शीमध्ये प्रचारादरम्यान अर्चना पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. 'माझा नवरा भाजपचा आमदार आहे, तर राजेंद्र राऊतदेखील भाजप आमदार आहेत, त्यांचा मला भावासारखा पाठिंबा आहे, असं असताना मी कशासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वाढवू, मी इथूनच विजयी होणार,' असा विश्वास अर्चना पाटील यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
धाराशिव लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीत मोठा खल झाला. यानंतर राष्ट्रवादीने अर्चना पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. अर्चना पाटील या भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. आता अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीबाबतच असं विधान केल्यामुळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागलं आहे.
बारामतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं नेतृत्व दिसत नाही, त्यामुळे तुमचं राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढवणार आहात का? असा प्रश्न अर्चना पाटील यांना विचारण्यात आला होता, त्यावर अर्चना पाटील यांनी अजब उत्तर दिलं. 'मी कशाला वाढवू? मी महायुतीची उमेदवार आहे. माझी उमेदवारी महायुतीची, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी 400 पार जाण्यासाठी आहे. राजेंद्र राऊत महायुतीचे घटक आहेत. माझा नवरा भाजपचा आमदार आहे. मला राजेंद्र राऊतांचा भावासारखा पाठिंबा असताना, माझा गट पक्ष हा महायुती वाढणार आहे', असं अर्चना पाटील म्हणाल्या.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
April 07, 2024 5:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Loksabha Elections 2024 : 'माझा नवरा भाजप आमदार, मी का राष्ट्रवादी वाढवू?' अजितदादांच्या उमेदवाराचं अजब विधान