काय आहे निर्णय?
शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांची ( विशेषत: खासगी इंग्रजी शाळा) वेळ साडेपाच तासांपेक्षा जास्त नसावी, असा आदेश काढला आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत अतिरिक्त थांबवून त्यांच्याकडून अभ्यास घेतला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण वाढतो. त्यामुळे शाळेतील अध्यापनाचे काम हे साडेपाच तासांपेक्षा जास्त नसावं. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार हसत-खेळत पद्धतीनं शिकवावं, असं शिक्षण विभागानं स्पष्ट केलंय.
advertisement
साप बदला घेतो? नागमणीचं सत्य काय?; नागपंचमीनिमित्त दूर करा ‘हे’ गैरसमज
मुलांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा विचारही शाळांनी करावा , गरजेपुरतीच वहया पुस्तके आणण्यास सांगावीत, सर्व विषयांसाठी एकच वही ठेवावी. उर्वरीत पुस्तके शाळेतच ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी. मुलांचे पाठीवरील दप्तराचे ओझं कमी करण्यासाठी शाळांनी सर्व उपाय करावेत, असं या आदेशात स्पष्ट करण्यात आलंय.
अवघ्या 30 रुपयांपासून गिफ्ट; इतके सुंदर पर्याय की स्वस्त असल्याचं बहिणीला कळणारसुद्धा नाही!
बीड शहरात काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी शाळेत मुलीचा वर्गातच हार्ट अटॅकनं मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील शिक्षण तज्ज्ञ तसंच सामाजिक संघटनांनी अध्यापनाच्या वेळेत बदल करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर शिक्षण विभागानं हे आदेश दिले आहेत.