कशी झाली सुरुवात?
सध्या अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळे दिसून येतात. त्यामुळे एकाच परिसरात किंवा एकाच भागांमध्ये जवळपास चार ते पाच गणेश मंडळ आपल्याला दिसून येतात. मात्र, बीड जिल्ह्यामधील माजलगाव तालुक्यातील रेनापुरी आणि या शेलापुरी गावाने एक वेगळाच आदर्श दाखवून दिला आहे. एक गाव एक गणपती न बसवता दोन गावांमध्ये एकच सार्वजनिक गणपती बसवण्यात आला आहे.
advertisement
75 वर्षांपासून डोंबिवलीची शान असलेलं गणेश मंडळ, हटके देखाव्याची यंदाही जपलीय परंपरा
2007 मध्ये या दोन गावातील स्थानिक ग्रामस्थांनी आणि काही तरुणांनी एकत्र येत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार दोन गावामध्ये एक गणपती बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दोन गाव एक गणपतीची परंपरा सुरुवात झाली. या ठिकाणी दरवर्षी पर्यावरण पूरक मूर्ती तयार केली जाते. ही मूर्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि गावकरी बनवतात.
गणपती बाप्पा पावला! नारळाच्या मागणीत वाढ झाल्यानं विक्रेत्यांना अच्छे दिन
दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम
दरवर्षी या गणपती स्थापनेपासून दहा दिवसाच्या कालावधीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. आतापर्यंत कीर्तन, सामाजिक प्रबोधन, रक्तदान शिबिर,महिलांच्या घरावर त्यांच्या नावाच्या नामफलक लावण्याचे उपक्रम राबवण्यात आले आहेत. यावर्षी गणपती उत्सवाच्या काळात जे नवीन जन्माला येणारे मुले आहेत त्यांच्यासाठी बेबी किटचे वाटप करण्यात येणार आहे, असं ग्रामस्थ शरद नाईकनवरे यांनी सांगितले.