गणपती बाप्पा पावला! नारळाच्या मागणीत वाढ झाल्यानं विक्रेत्यांना अच्छे दिन
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गणरायाच्या आगमानानं विघ्न दूर होतात, अशी भाविकांचाी श्रद्धा आहे. पुण्यातल्या नारळ विक्रेत्यांना याची प्रचिती आलीय.
पुणे, 22 सप्टेंबर : गणपती ही सुखकर्ता आणि विघ्नहर्ता देवता आहे. गणरायाच्या आगमानानं विघ्न दूर होतात, अशी भाविकांचाी श्रद्धा आहे. पुण्यातल्या नारळ विक्रेत्यांना याची प्रचिती आलीय. गणेशोत्सवात नारळाला मोठं महत्त्व आहे. या कालावधीमध्ये नारळाच्या मागणीत पाचपटीनं वाढ झाल्यानं या विक्रेत्यांना अच्छे दिन आलेत.
पुण्यातल्या गुलटेकडी मार्केट यार्डमधील भुसार बाजारात कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून नारळाची मोठी आवक होत आहे. यावर्षी नारळाचं उत्पादन चांगलं असल्यानं दरही स्थिर आहेत. 50 ते 60 लाख नारळांची विक्री होते. सध्या किरकोळ विक्रेत्यांकडून 20 ते 25 टक्क्यांनी मागणीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत दर्जानुसार 20 ते 40 रुपये आहे, अशी माहिती मार्केट यार्ड भुसार बाजारातील व्यापारी सुरेंद्र शिंदे यांनी दिली.
advertisement
नारळ हे हिंदू धर्मात पूजेचा एक महत्त्वाचा घटक आहे. गणपतीच्या पूजेसाठी नारळाचा वापर केला जातो. तसेच, तोरण बनवण्यासाठीही नारळाचा वापर केला जातो. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नारळाला मोठी मागणी असते..भाविकांकडून उत्सवाच्या काळात नवस फेडण्यासाठी नारळाचे तोरण अर्पण करण्याची प्रथा आहे. नारळाला दुकानदारांसह हॉटेल व्यावसायिक, खानावळचालकांकडूनही मोठी मागणी असते.
advertisement
गणेशोत्सवात बाहेरगावाहून मोठय़ा संख्येने भाविक पुण्यात येतात. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक तसेच रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांकडून नारळाला मोठी मागणी असते.गणेशोत्सवात उकडीचे मोदक गणरायाला प्रसाद म्हणून अर्पण केले जातात. या मोदकांसाठी नारळाचा वापर केला जातो. घरोघरी हे मोदक उत्सवाच्या काळात तयार केले जातात. या सर्व कारणांमुळे नारळ विक्रेत्यांना अच्छे दिन आल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 22, 2023 11:18 AM IST