दर्ग्यातून येतो बाप्पाच्या आरतीचा आवाज; संभाजीनगरमध्ये असा होतो गणेशोत्सव साजरा...

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरमधील एका दर्ग्यातून गणपतीच्या आरतीचा आवाज येतोय. पाहा काय आहे कारण..

+
दर्ग्यातून

दर्ग्यातून येतो बाप्पाच्या आरतीचा आवाज; संभाजीनगरमध्ये असा होतो गणेशोत्सव साजरा...

छत्रपती संभाजीनगर, 21 सप्टेंबर : गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सर्वजण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना करतात. तसेच मंडळांमध्ये देखील गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. पण तुम्ही कधी ऐकले का दर्ग्यामध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली. तर हे खरंय हिंदू मुस्लिम ऐक्याची ही अनोखी परंपरा छत्रपती संभाजीनगर मधील पडेगाव भागात आहे. दरवर्षी सैलानी बाबाच्या दर्ग्यामध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते.
30 वर्षांपासून सुरू आहे परंपरा
संभाजीनगर येथील पडेगाव भागात असलेल्या सैलानी बाबाच्या दर्ग्यामध्ये गेल्या 30 वर्षापासून गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. तिथे दहा दिवस अगदी मनोभावे गणरायाची पूजा अर्चा केली जाते. हिंदू मुस्लिम भक्त एकत्र येऊन इथे सर्व सण आनंदात व उत्साहामध्ये साजरे करतात. गेल्या 40 वर्षापासून हा दर्गाह इथे आहे. तर गेल्या 30 वर्षापासून एकदाही खंड न पडता इथे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. इथे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण शहरातून लोक हे येत असतात. इथे जी इच्छा मागितली ती सैलानी बाबा व गणपती बाप्पा पूर्ण करतात अशी भक्तांची धारणा आहे.
advertisement
मोठ्या उत्साहाने होतो गणेशोत्सव
मी इथे गेल्या 40 वर्षापासून येतो. इथे गेल्या 30 वर्षापासून गणपतीची स्थापना केली जाते. आम्ही सर्वजण आनंदाने उत्साहाने सर्व भक्ती भावाने गणपतीची सेवा करतो. यातून आम्हाला खूप आनंद भेटतो, असे भक्त सांगतात. तर ईद असो की गणेश चतुर्थी आणि दहीहंडी आम्ही सर्वधर्मीय एकत्रितपणे हे साजरे करतो, असे गणेशभक्त शैलेश चौगुले सांगतात.
advertisement
हिंदू मुस्लीम ऐक्याचं उदाहरण
मी लहानपणापासून येथे येते. मला इथे येऊन खूप प्रसन्न वाटतं. हिंदू मुस्लिम एकतेचं उदाहरण इथं आहे. इथे मागितलेली इच्छा पूर्ण होते. सर्वधर्मीय बांधव एकत्र येऊन उत्सव साजरा करत असल्याचा आनंद आहे, असे गणेशभक्त दिव्या मस्के सांगतात.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
दर्ग्यातून येतो बाप्पाच्या आरतीचा आवाज; संभाजीनगरमध्ये असा होतो गणेशोत्सव साजरा...
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement