शिरोडी खुर्द हे गाव फुल शेती व्यवसायामध्ये अग्रेसर आहे, त्यामुळे गावातील नागरिकांचा अनुभव ऐकून झेंडू फुलांच्या झाडांची लागवड केली, आणि यामध्ये आवड निर्माण झाली त्यामुळे झेंडू फुल शेती करणे सोपे झाले. गतवर्षी या शेतीमध्ये 35 क्विंटल झेंडू निघाला होता, आणि यांना देखील 30 ते 40 क्विंटल झेंडू निघणे अपेक्षित आहे व झेंडू झाडांना बांबूने बांधणे देखील गरजेचे आहे कारण की बांबू चा वापर नाही केला तर काही वेळेला झाडं आडवी पडतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. या सर्व फुलशेतीच्या माध्यमातून यावर्षी दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल.
advertisement
झेंडू शेती कशी करावी ?
नवीन शेतकरी किंवा तरुणांना फुल शेतीमध्ये यायचे झाल्यास त्यांनी सुरुवातीच्या काळात म्हणजेच झेंडू झाडांची लागवड करताना मल्चिंग करणे महत्त्वाच्या आहे. मात्र यंदा सप्टेंबर मध्ये पाऊस सुरू असल्यामुळे आम्हाला मल्चिंग करता आली नाही, मल्चिंग केल्यामुळे वीस ते पंचवीस दिवस शिल्लक या झेंडू बागातून उत्पादन घेता येते आणि यामुळे दहा ते पंधरा क्विंटर उत्पादन जास्त निघते. झेंडू साठी फवारणी आणि ड्रीप एप्लीकेशनचे योग्य नियोजन केले तर झेंडू हा लागवडीपासून चार महिने उत्पादन देऊ शकतो आणि झाडेही टिकू शकतात. या झाडांचे संरक्षण करण्यासाठी सदाबहार किट तसेच 19-19, फ्लोरा आणि शेणखताचा देखील या शेतीसाठी वापर केला आहे, तसेच यासाठी फवारणीचे वेळापत्रक नियोजनपूर्वक ठेवले, आणि या व्यवसायामध्ये स्वतः महिन्यात घेणे महत्त्वाचे आहे तेव्हा चांगले उत्पन्न मिळते असे देखील भगवान पाटील यांनी म्हटले आहे.