मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर शहरातील साकोली रोडवरील असलेल्या कथित आयुर्वेदिक रुग्णालयात मुळचे हरियाणाचे असलेले दिपक अमरपाल सिंग,लवली राजवीर कुमार,सुरेश प्रेमचंद कुमार,अमन बलवान सिंग, अभिषेक रिषीपाल पाच जण घुसले होते. दवाखान्यात शिरताच दिपक सिंग आणि लवली राजवीर यांनी प्लास्टिक टेबलचा पाया काढून अमृतपाल यांच्या चेहऱ्यावर व हातावर मारहाण करण्यास सुरूवात केली. सुरेश कुमार यांनी सिमेंटचे दगड फेकून दोघांवर हल्ला चढवला. इतर साथीदारांनीही बेदम मारहाण केली.
advertisement
या हल्ल्यात अमृतपाल सिंग गंभीर जखमी झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर व हातावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. साक्षीदारांच्या मते, काही आरोपी बेसबॉल स्टिकने सुसज्ज होते.हल्ल्याची माहिती मिळताच नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. तेव्हा नागरिकांनी धाडस दाखवत दिपक सिंग आणि लवली राजवीर कुमार यांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी बाकीचे आरोपी पसार झाले होते. दरम्यान ताब्यात घेतलेल्या दोघांनी आपल्या अन्यासाथीदारांना लाखांदूर पोलीस ठाण्यात बनवून घेतले त्यानंतर लाखांदूर पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
