TRENDING:

BJP Corporator : भाजपला धक्का! तीन अपत्य असल्याची माहिती लपवली, नगरसेवकाचं पद धोक्यात

Last Updated:

BJP Corporator Bharat Bhoir : नवी मुंबई महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक भरत भोईर हे दोन अपत्य नियम प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई : महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक भरत भोईर हे दोन अपत्य नियम प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. तिसऱ्या अपत्याबाबत नियमांचे उल्लंघन केल्याचा भोईर यांच्यावर आरोप आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना कोणत्याही धोरणात्मक निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्यास तात्पुरती मनाई केली आहे.
BJP Corporator
BJP Corporator
advertisement

अपक्ष म्हणून निवडणूक लढवली

भरत भोईर यांनी अपक्ष म्हणून महानगरपालिका निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या विरोधात तुर्भे येथील सविता देवीदास लगाडे यांनी बेलापूर येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याचिकेत उल्लेख काय?

याचिकेनुसार, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम १० (१) (ज) अंतर्गत ‘दोन अपत्य नियम’ लागू आहे. लगाडे यांनी दावा केला आहे की, भोईर यांना १७ फेब्रुवारी २००२ रोजी तिसरे अपत्य झाले, जे कायद्यानुसार निश्चित करण्यात आलेल्या १२ सप्टेंबर २००१ या अंतिम मुदतीनंतरचे आहे. त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतात, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ रुग्णालयातील नोंदी, जन्मनोंदणी रजिस्टर तसेच महापालिकेचे अधिकृत अभिलेख सादर करण्यात आले आहेत. मात्र, भोईर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार संबंधित अपत्याचा जन्मदिनांक १० मे २००१ असा दाखवण्यात आला आहे, जो कायदेशीर मुदतीपूर्वीचा आहे.

advertisement

पुढील सुनावणी कधी?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सलाम! ‘ते’ दृश्य पाहिलं अन् कार घ्यायचा प्लॅन रद्द केला, थेट ॲम्ब्युलन्स घेतली, नववी पास महिलेचं मोठं काम, Video
सर्व पहा

प्रकरणाच्या गांभीर्याचा विचार करून आणि पुराव्यांमध्ये फेरफार होण्याची शक्यता लक्षात घेऊन न्यायालयाने एकतर्फी अंतरिम आदेश दिला आहे. त्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांना मूळ जन्मनोंदी सील करून सुरक्षित ठेवण्याचे तसेच जन्मनोंदणी रजिस्टर आणि संगणकीय नोंदी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Corporator : भाजपला धक्का! तीन अपत्य असल्याची माहिती लपवली, नगरसेवकाचं पद धोक्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल