भास्कर जाधव पक्षावर पुन्हा नाराज?
राज्यातील महापालिका निवडणूक सरताच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची जबाबदारी स्वाभाविक पक्षाचे नेते म्हणून भास्कर जाधव यांच्याकडे असणे अपेक्षित आहे. परंतु पक्षाकडून ताकद मिळत नसल्याने जिल्ह्यातील निवडणुकांकडे भास्कर जाधव कानाडोळा करीत असल्याचे जाणवते.
advertisement
भास्कर जाधव यांचा जिल्ह्यातील निवडणुकांकडे कानाडोळा?
शिवसेनेसंबंधी जिल्ह्यातले मला माहिती नाही पण माझ्या मतदारसंघातील तीनही पंचायत समितीमध्ये मी सर्व जागा जिंकेन, असे भास्कर जाधव म्हणाले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांचे विधान राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. भास्कर जाधव यांचा जिल्ह्यातील निवडणुकांकडे काना डोळा होत आहे का? असा सवालही उपस्थित होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भास्कर जाधव माध्यमांपासून दूर आहेत. राज्यातील राजकीय परिस्थिवरही भाष्य करणे टाळत आहेत.
माझ्या मतदारसंघातील तीनही पंचायत समिती मी जिंकणार, जिल्ह्याचे मला माहिती नाही
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भास्कर जाधव यांचा केवळ त्यांच्या मतदार संघावर फोकस आहे. भाजपकडून आतापर्यंत पक्ष फोडून झाले, मतदार याद्यात घोळ सुरू आहेत. भरमसाठ पैशांचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा त्यांचा फंडा आहे. मात्र त्याउलट आमच्याकडे पैसे नाहीत, प्रचंड जनशक्ती आहे. धनशक्तीसमोर जनशक्ती भारी पडेल असा मला विश्वास आहे. माझ्या मतदारसंघातील तीनही पंचायत समिती मी जिंकणार, असे भास्कर जाधव म्हणाले. गुहागरमधील १५ उमेदवारांचे अर्ज भरून झाल्यानंतर भास्कर जाधव माध्यमांशी बोलत होते.
