TRENDING:

Bhigwan Case: मुलीची टिकली गायब, तिच्यावर प्रचंड दबाव, तिला घरी सोडा, SP ची हत्तीवरून मिरवणूक काढतो : पडळकर

Last Updated:

अपहरणाच्या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात यावे. पोलीस अधीक्षकांनी मुलीची सुखरूपपणे सुटका करावी, आम्ही त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढतो, असे पडळकर म्हणाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुमित सोनावणे, प्रतिनिधी, पुणे (इंदापूर) : माझे माझ्या प्रियकरावर प्रचंड प्रेम असून त्याने अजिबात माझ्यावर अजिबात जबरदस्ती केली नाही, माझ्या मर्जीनेच मी घराबाहेर पडली आहे, असे भिगवणच्या अपहरण प्रकरणातील तरुणीने स्पष्ट केले. मात्र तसे सांगण्यासाठी तिच्यावर दबाव असल्याचे भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. त्यांनी पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली. पुण्याच्या पोलीस अधीक्षकांनी मुलीला सुखरूपपणे कुटुंबियांकडे आणून सोडावी, मी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढतो, असे पडळकर म्हणाले.
भिगवण तरूणी अपहरण प्रकरण
भिगवण तरूणी अपहरण प्रकरण
advertisement

भिगवण येथून मंगळवारी दुपारी तीन वाजता मुलीचे अपहरण झाल्याचे सांगण्यात आले. मुलगी खरेदीहून येत असताना आरोपीने मुलीच्या घरच्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून मुलीचे अपहरण केल्याचा आरोप आहे. मात्र कथित अपहरणाच्या २४ तासांनंतर माझे अपहरण झालेले नसून आमचे प्रेमप्रकरण असल्याचे मुलीने व्हिडीओद्वारे सांगितले आहे. हे अपहरण प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय ठरल्यानंतर पडळकर भिगवणला आले. तिथे हजारोंचा जमाव जमला होता. पडळकर यांच्या नेतृत्वात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजनही केले गेले होते. परंतु पोलिसांनी मज्जाव केल्याने मोर्चा होऊ शकला नाही.

advertisement

पोलीस अधीक्षकांनी मुलीची सुखरूपपणे सुटका करावी, त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढतो

त्यानंतर पडळकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. पडळकर म्हणाले, अपहरणाच्या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात यावे. याआधी अजहर शेखने तलाठ्याला मारहाण केली मात्र पोलिसांनी अटक केली नाही. त्याच्यावर अनेक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. खरे तर त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करून त्याला बेड्या ठोकाव्यात. आमची मुलगी तिच्या आईच्या ताब्यात आणून द्यावी. MPSC पास झालेल्या मुलासोबत मुलीचे लग्न ठरले होते. पोलीस अधीक्षकांनी मुलीची सुखरूपपणे सुटका करावी, आम्ही त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढतो.

advertisement

व्हिडिओमध्ये मुलीची टिकली गायब

पोलिसांकडून आम्हाला त्वरित निकाल पाहिजे. व्हिडिओमध्ये मुलीची टिकली गायब केली आहे. हा मताचा विषय नाही तर हा आमच्या अस्तित्वाचा विषय आहे. भारता सारखा सुरक्षित देश जगात कुठे नाही. भारत हरल्यावर जे फटाके उडवतात, त्यांना जागा दाखवायची वेळ आलीय, असेही पडळकर म्हणाले.

माझे मुलावर प्रेम-मुलीचा कबुलीजबाब

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
...तर खरी शिवजयंती साजरी होईल, शिव व्याख्याते बांगर यांचं परखड भाष्य, Video
सर्व पहा

भिगवण येथील मुलीच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून संबंधित मुलीने आपण स्वमर्जीने घराबाहेर पडल्याचे सांगितले आहे. माझ्यावर कुणाचीही जबरदस्ती नाही, माझे त्या मुलावर प्रेम आहे, असा कबुलीजबाब मुलीने दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhigwan Case: मुलीची टिकली गायब, तिच्यावर प्रचंड दबाव, तिला घरी सोडा, SP ची हत्तीवरून मिरवणूक काढतो : पडळकर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल