TRENDING:

Bhiwandi: भाजपमध्ये सगळ्यात मोठी बंडखोरी, चौधरींचे समर्थक नगरसेवक फुटणार, काँग्रेसला पाठिंबा? महापौरपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट

Last Updated:

नारायण चौधरी यांच्या नाराजीनंतर त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेऊन सेक्युलर फ्रंटसोबत चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नरेश पाटील, प्रतिनिधी, भिवंडी (ठाणे): भिवंडी महापालिकेची निवडणूक काही तासांवर आलेली असताना भारतीय जनता पक्षात फूट पडली आहे. भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदल्याने काही नगरसेवकांनी सेक्युलर पार्टीसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाला काही तास बाकी असताना महापौर पदाच्या निवडणुकीला वेगळे वळण लागले आहे.
भिवंडी महापालिका
भिवंडी महापालिका
advertisement

भाजपने ऐनवेळी महापौरपदाचा उमेदवार बदलला आहे. नारायण चौधरी यांच्याऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला. दुसरीकडे पक्षाच्या बदललेल्या निर्णयानंतरही नारायण चौधरी यांनी महापौरपदाचा उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

नारायण चौधरींचे समर्थक नगरसेवक आक्रमक

पक्षाच्या निर्णयानंतर नारायण चौधरी नाराज असल्याचे कळते. नारायण चौधरी यांच्या नाराजीनंतर त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेऊन सेक्युलर फ्रंटसोबत चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे. या सेक्युलर फ्रंटमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपचे काही नगरसेवक असतील, अशी माहिती आहे.

advertisement

भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला अन् पक्षात नाराजी

स्नेहा मेहुल पाटील यांना संधी देत असल्याची अधिकृत घोषणा भाजप शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी केली. नगरसेवकांना लेखी पत्राद्वारे निर्णयाची माहिती देखील कळविण्यात आली. या निर्णयानंतर नारायण चौधरी यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. आपण वेगळी भूमिका घेऊ, असा आग्रह त्यांनी नारायण चौधरी यांच्याकडे धरला. नगरसेवकांच्या मताला प्रमाण मानून त्यांनी सेलुक्यर फ्रंटशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.

advertisement

नारायण चौधरींनी तडकाफडकी सांगितलं- सेक्युलर फ्रंटसोबत चर्चा करण्यासाठी जातोय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रासायनिक काजळामुळे डोळ्यांना धोका? वेळीच घ्या अशी काळजी, सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

भाजपने मला नगरसेवक बनवले. त्यांनी मला महापौरपदाचे उमेदवारही बनवले. पक्षाचे त्यासाठी अभिनंदन. सहयोगी पक्षांबरोबर बोलून मी समीकरणे जुळवित असतानाच माहपौरपदाचा उमेदवार बदलण्याचा निर्णय पक्षाने घेतला. यादरम्यान पक्षातील लोकांनी आणि सहयोगी पक्षाच्या काही लोकांनी मला मदत केली नाही. त्यामुळे सेक्युलर फ्रंटसोबत चर्चा करण्याचे आम्ही ठरवले आहे, असे नाराज झालेल्या नारायण चौधरी यांनी माध्यमांना सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhiwandi: भाजपमध्ये सगळ्यात मोठी बंडखोरी, चौधरींचे समर्थक नगरसेवक फुटणार, काँग्रेसला पाठिंबा? महापौरपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल