एचआयव्ही रिपोर्ट काय आला?
प्राथमिक तपासात अशोक खरातने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे पीडितांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती. त्यावेळी विविध चाचण्या करण्यात आल्या असून त्यात एचआयव्ही चाचणीचाही समावेश होता.
आता समोर आलेल्या माहितीनुसार अशोक खरातचा एचआयव्ही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असला, तरी गुन्ह्याच्या स्वरूपामुळे तपास अधिकच तीव्र करण्यात आला आहे.
advertisement
संमोहित करून शोषण केल्याचा आरोप
एसआयटीच्या चौकशीतून धक्कादायक बाबी उघड होत आहेत. अशोक खरात हा महिलांना भविष्य सांगण्याचे, तसेच घरातील दोष दूर करण्याचे आमिष दाखवत आपल्या जाळ्यात ओढत असे. तर दुसरीकडे काही तक्रारींनुसार, तो संमोहन किंवा भीती निर्माण करून महिलांचे शारीरिक शोषण करत असल्याचे आरोप आहेत.
२९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
तपासात आतापर्यंत १५० हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अनेक पीडित महिला भीतीमुळे समोर येण्यास टाळाटाळ करत असल्याचेही समोर आले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
व्हॉट्सअॅपवरील व्हॉइस मेसेजच्या माध्यमातून संपर्क
भोंदू अशोक खरात हा व्हॉट्सअॅपवरील व्हॉइस मेसेजच्या माध्यमातून संपर्क साधत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. त्याच्या मोबाईलमधील डेटा सध्या पुनर्प्राप्त (रिकव्हर) करण्याचे काम सुरू असून, काही महत्त्वाचे मेसेज डिलीट करण्यात आले असण्याची शक्यता तपासली जात आहे.
एसआयटी पथक, सायबर पोलिस आणि तज्ज्ञांच्या मदतीने मोबाईलमधील माहिती पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रक्रियेतून खरात कोणाच्या नियमित संपर्कात होता, तसेच व्हॉइस टायपिंग किंवा व्हॉइस मेसेजमधून कोणती महत्त्वाची माहिती मिळू शकते, याचा शोध घेतला जात आहे.
याशिवाय, त्याच्या संपर्कातील व्यक्तींची ओळख पटवून त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते. मोबाईल डेटा पूर्णपणे रिकव्हर झाल्यानंतर अनेक संभाषणे आणि संबंधित व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
