अचलपूर नगरपरिषद अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपरिषद म्हणून या नगरपरिषदेची ओळख आहे. या नगरपरिषदेवर नगराध्यक्ष म्हणून भाजपच्या रूपाली माथने ह्या विजयी झाल्या आहे. दोन-चार नव्हे तर तब्बल 40 हजार मतांनी रूपाली माथने यांचा विजय या ठिकाणी झाला आहे.
advertisement
मात्र, नगरसेवकांमध्ये भाजपाला या ठिकाणी फार यश आलं नाही सर्वाधिक नगरसेवक या ठिकाणी काँग्रेसचे निवडून आले आहे. असं असताना आता समित्यांच्या सभापती निवडीसाठी या ठिकाणी ज्या गटांमध्ये एमआयएम आहे तो गट देखील भाजपसोबत समित्यासाठी सहभागी झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या सर्व प्रकाराची मला कुठलीच माहिती नसल्याचं भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी सांगितलं आहे.
अचलपूर नगरपरिषदेमध्ये पक्षीय बलाबल
काँग्रेस 15
भाजप 9
एमआयएम 3
अपक्ष 10
प्रहार 2
राष्ट्रवादी काँग्रेस 2
आता समित्याच्या सभापती निवडीसाठी मात्र सर्व पक्षांनी आप आपला फायदा बघून घेतला आहे यामध्ये भाजपला महिला बालकल्याण समिती
काँग्रेसला पाणीपुरवठा सभापती.
प्रहारला बांधकाम सभापती
राष्ट्रवादी काँग्रेस-AP आरोग्य सभापती
एमआयएमला-शिक्षण क्रीडा सभापती
एका अपक्षाला नियोजन सभापती देण्यात आलं आहे. या सर्व प्रकारावर आता भाजपचे स्वीकृत नगरसेवक अभय माथने यांनी भूमिका मांडली आहे. "एमआयएमसोबत आम्ही कुठलीही युती केली नाही, ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
एमआयएमने भाजपाला समर्थन दिलं नाही. या नगरपरिषदमध्ये एमआयएमचे तीन, अपक्ष 3 आणि राष्ट्रवादी AP-2 असा गट तयार केल्याने त्यांना समिती मिळाली. त्यामुळे ही युती म्हणता येणार नाही, असं एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा खापर एमआयएमने काँग्रेसवर फोडलं आहे.
एकीकडे भाजपच्या वरिष्ठांकडून एमआयएम सोबत युती केल्याने अकोटच्या आमदारांना नोटीस पाठवल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे अशा पद्धतीने समित्यांमध्ये भाजप आणि एमआयएमसोबत असल्याने मात्र आता वरिष्ठ काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
