फुलंब्रीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ठोंबरे यांना तीन अपत्ये असल्याचे भाजपाचे उमेदवार शिरसाट यांनी आक्षेप घेतले होते. फुलंब्रीत ठाकरे गटाचे उमेदवार ठोंबरे यांच्या उमेदवारीवर भाजपचे सुहास शिरसाट यांनी ‘तीन अपत्ये’ असल्याचा आक्षेप घेतला होता. हा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाली काढत ठोंबरे यांची उमेदवारी वैध ठरवली. निर्णयानंतर शिरसाट यांनी, “ठोंबरे यांच्या कुटुंबीयांची अचूक माहिती समोर यावी, यासाठी आम्ही डीएनए टेस्टची मागणी करणार आहोत”, असे म्हणत नवा वाद निर्माण केला आहे.
advertisement
वैजापूर–गंगापूरमध्येही विरोधकांचे आक्षेप फेटाळले
वैजापूर नगरपालिकेच्या प्रभाग २ मधील शिंदे गटाचे उमेदवार संदीप बोर्डे, तसेच गंगापूर प्रभाग ६ मधील काँग्रेसचे नईम मन्सूरी यांच्या उमेदवारीवरील विरोधकांचे आक्षेपही फेटाळण्यात आले. त्यामुळे दोघांच्याही मार्गातील अडथळे दूर झाले आहेत.
पैठणमध्ये भाजपांचे तीन उमेदवार कोर्टात
पैठण नगरपरिषद निवडणुकीत मात्र परिस्थिती वेगळी राहिली. भाजप उमेदवार प्रियंका योगेश गव्हाणे, सिद्धार्थ गोपाल परदेशी आणि रशीद अब्बास कुरेशी यांचे अर्ज छाननीतच अवैध ठरविण्यात आले. एबी फॉर्म चुकीच्या प्रकारे भरल्याचा मुद्दा नमूद करत निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज फेटाळून लावला. या निर्णयाविरोधात तिन्ही उमेदवारांनी बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले.
पैठणमध्ये भाजपाचे ३ उमेदवार न्यायालयात
पैठण नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार प्रियंका योगेश गव्हाणे, सिद्धार्थ गोपाल परदेशी आणि रशीद अब्बास कुरेशी यांचे अर्ज छाननीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पक्षाचे एबी फॉर्म चुकीच्या पद्धतीने भरल्याच्या कारणावरून अवैध ठरविले होते. त्यांनी या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात बुधवारी अपील केले आहे. निकाल आमच्या बाजूने येईल, असा विश्वास माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी व्यक्त केला.
