मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पालखी घेत असताना आशा बुचके यांनी सुनेत्रा पवार यांना धक्का देऊन पुढे सरसावल्याचे दिसते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
बुचके यांच्या वर्तनाने राजशिष्टाचार भंग झाल्याची चर्चा
हे दृश्य मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार-एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घडले असल्याने नेटकऱ्यांनी बुचके यांच्यावरून संताप व्यक्त केला. यामुळे कार्यक्रमाच्या शिस्तीवर आणि राजकीय शिष्टाचारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बुचके यांच्या वर्तनाने राजशिष्टाचार भंग झाल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली.
advertisement
पाळणा म्हणणाऱ्या महिलेला बाजूला ढकलले, फडणवीसांसमोर फोटोसाठी पोझ
जन्मोत्सव सोहळा सुरू असताना पाळणा म्हणणाऱ्या महिलेला बाजूला ढकलून बुचके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर फोटोसाठी पोझ दिल्याचे दिसते. हे वर्तन शिवजयंतीच्या कार्यक्रमात झाल्याने सोशल मीडियावर मीम्स आणि टीका सुरू आहे.
सुनेत्रा पवार ताटकळत राहिल्या, आशाताई बुचकेंचं जोरात भाषण
आशाताई बुचके यांनी सुनेत्रा पवार यांना ताटकळत ठेवून भाषण केले. या प्रकारावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हातवारे करून नाराजी व्यक्त केल्यानंतर बुचके यांनी भाषण आटोपते घेतले. बुचके यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपले अधिकृत मनोगत व्यक्त केले. मात्र या प्रकारामुळे प्रोटोकॉलचा भंग झाल्याची चर्चा कार्यक्रमानंतर राजकीय आणि सोशल मीडियावर जोर धरत असून बुचके यांना ट्रोलही केले जात आहे.
