advertisement

Business Ideas : इडली, आलं-लसूण पेस्ट अन् चपाती होईल झटपट, बिझनेससाठी बेस्ट असं ग्राइंडर, किंमत किती?

Last Updated:

या यंत्रामध्ये इडली, डोसा, वडा, अप्पे, ठेचा, आलं-लसूण पेस्ट चपातीसाठी तसेच विविध धान्यांचे ओले पीठ आणि पाट्यावर वाटले जाणारे सर्व पदार्थ पीठ तयार केले जाते.

+
लघुउद्योजकांसाठी

लघुउद्योजकांसाठी गेम-चेंजर? वेट ग्राइंडरची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या..!

छत्रपती संभाजीनगर : घरगुती तसेच लघुउद्योग आणि हॉटेल व्यवसायासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेट ग्राइंडर या यंत्राविषयी ग्राहकांमध्ये वाढती उत्सुकता दिसून येत असून, विक्रेत्याकडून यंत्राची सविस्तर माहिती घेण्यात आली आहे. या यंत्रामध्ये इडली, डोसा, वडा, अप्पे, ठेचा, आलं-लसूण पेस्ट चपातीसाठी तसेच विविध धान्यांचे ओले पीठ आणि पाट्यावर वाटले जाणारे सर्व पदार्थ पीठ तयार केले जाते. शिवाय यंत्राचे वैशिष्ट्य काय, वापरण्याची सोपी पद्धत, देखभाल आणि त्याची अंदाजे किंमत याबाबतही माहिती जाणून घेणार आहोत, तसेच हे यंत्र घरगुती वापरकर्ते, केटरिंग व्यावसायिक तसेच लघुउद्योजकांसाठी फायदेशीर ठरू शकते याविषयी वेट ग्राइंडर विक्रेते अहमसा कादर यांच्याकडून लोकल 18 च्या माध्यमातून माहिती जाणून घेऊ.
वेट ग्राइंडर या यंत्राचे जीवन पंधरा ते वीस वर्षांचे आहे. तसेच इडली डोसा करताना लागणारे तांदूळ तसेच पुरणपोळीचे पुरण देखील यामध्ये वाटले जातात. तसेच कोरड्या पदार्थांमध्ये शेंगदाण्याचा कूट, गरम मसाला, धने - जिरा देखील वाटला जातो. एका वेळेला कमीत कमी मूठभर आणि जास्तीत जास्त अर्धा किलो वाटण यामध्ये निघते. तर मोठ्या यंत्रामध्ये एक किलोपर्यंत वाटण निघते. तसेच पोळ्यांच्या बाबतीत इडलीसाठी दोन पोळ्या आणि जास्तीत जास्त बारा पोळ्यांपर्यंत ओला आटा निघतो. तर मोठ्या यंत्रांमध्ये पाच पोळ्या ते पंचवीस पोळ्यांपर्यंत आटा काढला जातो.
advertisement
यंत्राची किंमत किती?
वेट ग्राइंडर या छोट्या यंत्राची किंमत 7,800 तर आणि मोठे यंत्र 8,700 रुपयांना उपलब्ध आहे. दोन्ही यंत्रांवर एक हजार रुपयांचे डिस्काउंट मिळते. तसेच यंत्रासाठी दोन वर्षांची वॉरंटी असणार आहे. यंत्रामध्ये काही बिघाड झाल्यास दोन वेळेस सेवा मोफत दिली जाणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Business Ideas : इडली, आलं-लसूण पेस्ट अन् चपाती होईल झटपट, बिझनेससाठी बेस्ट असं ग्राइंडर, किंमत किती?
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement