Weekly Horoscope: धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीफळ; मिळणार एकदाची कष्टाला नशिबाची जोड!
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope: दिनांक 23 फेब्रुवारी पासून या महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होत आहे. हा आठवडा काही राशींना खास असणार आहे. काही राशींना कठोर परिश्रमानंतर यश मिळेल, तर काहींना संयम आणि सतर्कता बाळगावी लागेल. अडचणींनंतर काही राशींच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल, ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीफळ जाणून घेऊ.
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचे नवे मार्ग उघडणारा आहे. तुम्ही ज्या नवीन कामाची वाट पाहत होता, ते या आठवड्यात सुरू होऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. तीर्थयात्रेचा योग असून धार्मिक प्रवासातून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. समाजात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. लेखन, कला किंवा संशोधन क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ गौरवाचा ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील.
advertisement
मकर - तुमच्या मेहनतीला आता नशिबाची जोड मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या योजनेवर काम करत होता, ती आता यशस्वी होताना दिसेल. व्यापार करणाऱ्यांना बाजारातील स्थितीचा फायदा होऊन मोठा नफा मिळेल. कुटुंबात सण किंवा उत्सव साजरा केला जाईल. तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल, तरीही नियमित व्यायाम सुरू ठेवा. नात्यांमध्ये आलेला दुरावा मिटून पुन्हा प्रेम वाढेल. बोलताना नम्रता ठेवल्यास अनेक कठीण प्रसंग टाळता येतील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन - कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद घालू नका, अन्यथा तुमच्यावर कारवाई होऊ शकते. भावंडांमधील संपत्तीचे वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









